श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थानचा अखंड हरिनाम सप्ताह संपन्न
★आ.सुरेश धस यांचे सच्चे शिलेदार भाऊसाहेब भवर यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अंमळनेर सर्कलमध्ये अन्नदान!
★ह भ प महादेव भारती महाराज यांच्या भाऊसाहेब भवर यांना शुभ संदेश!
[ ह भ प महादेवानंद भारती महाराज कडून भाऊसाहेब भवर यांना भावी जिल्हा परिषद शब्द उच्चारताच जनतेतून टाळ्यांचा कडकडाट! ]
★अंमळनेर जिल्हा परिषद गटात शिक्षण आरोग्य धार्मिक क्षेत्रात अतुलनीय कार्य!
पाटोदा | सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी येथील प्रसिद्ध श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थानच्या श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताह सांगता समारंभाला परिसरातील यांचा जनसमुदाय जमला होता या ठिकाणी भव्य काल्याचे किर्तन ह भ प महादेवानंद भारती महाराज यांचे संपन्न झाले तर महाप्रसादाचे अन्नदान भाऊसाहेब अण्णा भवर यांच्याकडून ठेवण्यात आले होते. पुढील वर्षी देखील महाप्रसादाची पंगत भाऊसाहेब अण्णा भवर घेतली आहे त्यांच्या या उदात्त अंतकरणाच्या स्वभावामुळे हभप महादेवानंद भारती महाराज यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभ संदेश देताच जमलेल्या जनसमुदायाने टाळ्या वाजवून भाऊसाहेब अण्णा भवर यांचे स्वागत देखील केले.
श्री क्षेत्र अश्वलिंग देवस्थानच्या श्रावण महिन्यातील अखंड हरिनाम सप्ताहाची निमित्त भव्य कीर्तन आणि महाप्रसादाचा आयोजन करण्यात आले होते. परिसरातील हजारो नागरिकांनी उपस्थित राहून कीर्तनाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, ग्रामपंचायत सरपंच, सदस्य, मेंबर, सभापती, उपसभापती, परिसरातील नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
★महाराजांकडून भावी जि प सदस्य भाऊसाहेब भवर उल्लेख ; नागरिकांच्या टाळ्यांचा कडकडा!
अखंड हरिनाम सप्ताह निमित्त भाऊसाहेब भवर यांनी महाप्रसादाची पंगत दिली होती पुढच्या वर्षीची देखील पंगत त्यांच्याकडूनच होणार असल्याचं सांगितले तसेच भाऊसाहेब भवर यांचा सन्मान करण्यासाठी महाराजांनी त्यांना भावी जिल्हा परिषद सदस्य भाऊसाहेब भवर करताच उपस्थित नागरिकांकडून टाळ्यांचा कडकडाट झाला आणि येणाऱ्या काळासाठी शुभ संदेशच दिला ची चर्चा नागरिकांमध्ये सुरू झाली…
★पाटोदा तालुक्यातील शिक्षण आरोग्य धार्मिक क्षेत्रात सर्वाधिक कार्य!
आमदार सुरेश आण्णा धस यांचे समर्थक भाऊसाहेब भवर यांनी पाटोदा तालुक्यातील शिक्षण आरोग्य धार्मिक क्षेत्रात सर्वाधिक कार्य केल्याचं नागरिकांमधून बोललं जातं मग शिक्षण क्षेत्रात विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या सुख सुविधा आरोग्यासाठी लागणाऱ्या सुख सुविधा आणि धार्मिक क्षेत्रातील लागणाऱ्या सर्वच गोष्टींचा नागरिकांना उपयोग होईल अशा सर्वच गोष्टी त्यांनी देऊन नागरिकांच्या मनावर राज्य केले आहे त्यांच्या कार्याची चर्चा बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा पसरली आहे. आ.सुरेश आण्णा धस यांचा सच्चा शिलेदार म्हणून सुद्धा त्यांना ओळखलं जातं…
★आ.सुरेश अण्णांचा शब्द आमच्यासाठी आदेशाचं – भाऊसाहेब भवर
राजकीय, सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करताना आमदार सुरेश आण्णा धस आम्हाला देतील तो शब्द आमच्यासाठी आदेश असतो त्यांच्या शब्दावर आम्ही सर्व क्षेत्रात काम करतो आणि आज त्यांच्यामुळेच आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहोत येणाऱ्या काळात अण्णांना अपेक्षित असं कार्य आमच्या हातून होत आहे आणि होत राहील…
– भाऊसाहेब भवर
अण्णा समर्थक भाजपा ज्येष्ठ नेते.