मराठाक्रांती!
मराठ्यांचा वाघ लढतोय
मनोज जरांगे त्याचं नाव,
जालना जिल्ह्यात क्रांतीचं
अंतरवाली सराटी हे गाव.
दोन एकर जमीन विकून
पठ्ठ्या समाजासाठी लढतोय,
अख्या सरकारपुढं एकटाचं
तो हसत हसत भिडतोय.
समाजासाठी मेलो तरी
तो धन्य होईल म्हणतोय,
मराठा आरक्षणाचा विचार
त्याच्या नसानसात भिनतोय.
आमचे सगळे सोयरे कुणबी
मग आम्ही कसे नाही ?
सरकारकडे या प्रश्नाचं
उत्तर आहे का काही ?
गोळीबार आणि लाठीच्या जखमा
मराठे नाहीत विसरणार,
मराठा क्रांतीचा विचार
आता मनामनात पसरणार.
आमच्या न्याय हक्कापायी
आम्ही आरपारची लढाई लढू,
कायदेशिर मागणी करून
आता कायदेशिरच भिडू!
आता कायदेशिरच भिडू!
– श्री.संजय शेळके पांढरी ता. आष्टी.
मो.9975228585