★नांदेवाली गावच्या ग्रामस्थांनी घेतला ठराव !
शिरूरकासार | जिवन कदम
नांदेवाली येथील ग्रामस्थांनी मराठा समाजास आरक्षण मिळे पर्यंत गावात राजकीय लोकप्रतिनिधींना गाव बंदी करण्याचा ठराव सर्वामते घेतला आसुन गावातील चौका मधे ठिया अंदोलन करत घोषणा करण्यात आले आसल्याचे सरपंच अंकुश शेळके यांनी सांगीतले.
मराठा समाजाच्या आरक्षणा साठी अंतरवली येथे शिरूर तालुक्याचे भुमिपुञ मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे.त्यांना पाठिंबा करीता
नांदेवाली ग्रामस्थांकडून गावातील बाजार पेठ
बंद ठेवून रस्त्यावर ठिया अंदोलन करण्यात आले त्या नंतर शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या होत्या. तसेच आरक्षण मिळे पर्यंत सर्वच लोकप्रतिनिधींला गाव बंदी घालण्याचा ठराव सर्वामते ग्रामपंचायत च्या वतीने घेण्यात आला आहे.त्या ठरावाची प्रत अंतरवली येथे सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती अंधारे यांच्या हस्ते मनोज जरांगे यांना ग्रामस्थांकडून देण्यात आली.या वेळेस गावातील मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ अंतरवली येथे गेले होते.