24.5 C
New York
Friday, August 29, 2025

Buy now

spot_img
spot_img

पावसाचा खंड नव्हे दुष्काळच!

★शेतकरी नेते गणेश गणेश कवडेंच्या नेतृत्वाखाली तहसीलदार धडकला मोर्चा !

पाटोदा | सचिन पवार

पाटोदा तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन पिक विमा मिळाला पाहिजे यासाठी शेतकरी नेते गणेश कवडे यांनी तहसील वरती धडक मोर्चा काढला यावेळी मोर्चामध्ये शेकडो शेतकरी उपस्थित होते यावेळी गणेश कवडे यांनी सांगितले तालुक्यातील पाऊस मोजण्याचे पर्जन्यमापक चुकीच्या पद्धतीचे आहे. शेतामध्ये सोयाबीन करपून गेली आहे, त्यामुळे तात्काळ मंडळ वाईज सोयाबीनचे पंचनामे करून सोयाबीन 25% ॲग्रीम विम्यामध्ये पूर्ण तालुका घ्यावा. धडक मोर्चाच्या वेळी गणेश कवडे यांनी बोलताना म्हटले की ज्या ज्यावेळी शेतकऱ्याचे प्रश्न उपस्थितित होतील त्यावेळी मी रस्त्यावर हजारो शेतकरी घेऊन त्यांना हक्क मिळवून देण्यासाठी आवाज उठवत आलो आहे. तसेच ज्येष्ठ नेते कॉम्रेड महादेव नागरगोजे, विष्णुपंत घोलप, राजाभाऊ देशमुख, भागवत नांगरे, चक्रपाणी जाधव लहू नागरगोजे, देविदास काळे यांनीही मनोगत व्यक्त केले,तहसीलदार चितळे यांच्या कडे निवेदन देऊन शेतकऱ्याच्या मागण्याा मान्य करा अशी घोषणा शेतकऱ्यांच्या वतीने तहसीलदार यांच्या समोर करण्यात आली यावेळी चितळे यांनी निवेदना मध्ये दिल्या प्रमाणे शेतकऱ्यांना पिक विमा मंजूर करा व दुष्काळी परिस्थितीनुसार उपयोजना चालू कराव्यात अनेक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जिल्हाधिकारी यांच्या कडे हे निवेदन पाठवणार असे आश्वासन दिल्यानंतर शेतकरी नेते गणेश कवडे यांनी धरणे आंदोलन मागे घेतले या मोर्चाचे सूत्रसंचालन सय्यद साज्जेद यांनी केले यावेळी शेतकरी चळवळीतील रवींद्र घुमरे, बापूराव भवर, सुरेश तात्या घुमरे,योगेश ढवळे, बाबासाहेब घुमरे, आबा भोसले, राजू अण्णा भोसले, सुभाष घुमरे, दिनकर नागरगोजे, शेख इमरान, शिवाजीराव कोकाटे, संजय कोकाटे, दत्ता कोकाटे, अजित कोकाटे,भाऊसाहेब सानप, जीवन सानप, नवनाथ जगदाळे असे शेकडो शेतकरी उपस्थित होते.

★तात्काळ मंडळ निहाय पंचनामे करून सोयाबीनला 25 टक्के आग्रह विमा द्या

पाटोदा तालुक्यात सध्या दुष्काळ पडल्याचं स्पष्ट चित्र निर्माण झाला आहे दुष्काळ परिस्थितीनुसार उपाययोजना चालू कराव्यात आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा त्याचबरोबर तात्काळ मंडळनिहाय पंचनामे करून सोयाबीन पिकाला पंचवीस टक्के अग्रीम विम्यामध्ये पूर्ण तालुक्याला घेऊन तात्काळ विमा देण्यात यावा.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!