18.7 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन मराठ्यांच्या अस्मितेवर हल्ले ; महाराष्ट्राच्या संस्कृतीला काळिंबा फासणारे – किशोर पिंगळे

★ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्यातील सर्वांनीच राजीनामे देऊन राष्ट्रपती राजवट लागू करावी – राजमुद्रा संघटना

बीड | प्रतिनिधी

 

मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून जगापुढे आदर्श निर्माण करत लाखोंचे 58 मोर्चे अतिशय शांततेत काढणारा मराठा समाज आजही आपल्या न्याय हक्कासाठी शांततेत आंदोलन करत आहे. परंतु शांत असलेल्या मराठा समाजावर कुठलेही कारण नसताना अशाप्रकारे अमानुष मारहाण करून देशात आणि राज्यात अराजकता निर्माण करण्याचा भाजप सरकारचा डाव आहे. काल जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी याठिकाणी मनोज जरांगे व गावकरी अन्नत्याग आंदोलन करत असताना अचानकपणे पोलीस प्रशासनाला हाताशी धरून आंदोलनकर्त्या गावकऱ्यांसह सर्वांवर अतिशय अमानुष प्रकारे हल्ला करण्यात आला या हल्ल्यात अनेक लहान थोर आंदोलनकर्त्यांसह महिला भगिनींना देखील अतिशय अमानुषपणे मारहाण करण्यात आली. शांततेत आंदोलन सुरू असताना व कुठलेही कारण नसताना अचानकपणे आंदोलन स्थळाला छावणीचे स्वरूप देत गोळीबार, लाठीमार करणे हे माणुसकीला काळीमा फासणारे आहे. आंदोलनकर्ते अन्नत्याग आंदोलन करत आधीच भुकेने व्याकुळ झालेले असताना त्यात अशाप्रकारे मारहाण करणे हे अतिशय निंदनीय व खेदजनक आहे यासर्व प्रकरणाचा राजमुद्रा सामाजिक संघटनेच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करत झालेल्या दु्दैवी घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा द्यावा व संबंधित पोलीस अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी मागणी राजमुद्रा सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किशोर पिंगळे यांनी केली आहे.

★मराठ्यावरील हल्ला हा निंदनीय ; मराठा नेत्यांचे अपयश !

महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा आशीर्वाद घेऊन महाराष्ट्रावर राज्य करायचे आणि मराठ्यांवरच असे हल्ले करायचे ही खूप मोठी शोकांतिका आहे त्याचबरोबर मराठ्यांची नेते शांत बसून पाहतात हीच मोठी शोकांतिका आहे. आता मराठ्यांच्या नेत्यांनाच आधी धडा शिकवावा लागेल. कारण की घरातलीच फुटीरवादी झाल्यावर बाहेरच्यांच फावणारच आहे.

★महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी – राजमुद्रा संघटना

महाराष्ट्रामध्ये मराठ्यांनी लाखोंची मोर्चे काढले त्या ठिकाणी एकाही पोलीस कर्मचाऱ्याला इजा नाही तर बोलण्याची सुद्धा गरज पडली नाही परंतु छोट्याशा गावात चाललेले शांततेत आंदोलन इतकं कसं चिघळलं याला संपूर्ण ग्रह विभाग जबाबदार असून गृहमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा देऊन महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी तसेच दोषींवर कठोर कारवाई करावी अशीच मागणी राजमुद्रा सामाजिक संघटनेकडून होत आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!