14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

श्री संत भगवानबाबांच्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी!

★सावरगाव घाट येथील एक वर्षातील नवनिर्वाचित अधिकारी पदापर्यंत पोहोचलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा !

★ह.भ.प.निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे कीर्तन ; राजकीय नेत्यांची उपस्थिती – जय जवान ग्रुप

पाटोदा | सचिन पवार

राष्ट्रसंत भगवान बाबांच्या 127 व्या जन्मोत्सव सोहळ्याची जय्यत तयारी त्यांचे पावन जन्मस्थळ श्रीक्षेत्र सावरगाव घाट येथे होत असून जय जवान ग्रुपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
सोमवार 4 सप्टेंबर 2023 रोजी हा सोहळा संपन्न होत असून, रविवार 3 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी दोन ते तीन यावेळेत ह भ प महंत पांडुरंग महाराज (डोंगरेश्वर संस्थान करंजवण) यांच्या शुभ हस्ते कलश पूजन व प्रवचन होणार आहे. तसेच श्री संत भगवान बाबा यांच्या 127 जन्म महोत्सवा निमित्त सन 2023 निमित्त आयोजित सन्मान ज्ञान स्पर्धा पहिला गटाच्या चौथी ते सातवी मधून प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक तसेच दुसरा गट आठ ते बारा गेल्या 126 व्या जन्मोत्सवापासून ते 127 वा जन्मोत्सवापर्यंत सावरगाव घाट मधून नोकरीला लागलेल्या चा सन्मानचिन्ह देऊन गौरव वितरण जय जवान ग्रुप च्या वतीने देण्यात येणार आहे श्री संत भगवान बाबा यांच्या 127 वा जन्म सोळावा सन 2023 निमित्त आपल्या कार्यक्रमाच्या गौरव सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात येणार आहे. सायंकाळी चार ते सहा वेळात ह भ प निवृत्ती महाराज इंदुरीकर यांचे हरिकीर्तन व रात्री नऊ ते अकरा या वेळात सामुदायिक जागर होईल.दिनांक 4 सप्टेंबर 2023 सोमवारी सकाळी सहा वाजता घरोघरी गुढ्या उभारल्या जातील व संत भगवान बाबांच्या मूर्तीस जल अभिषेक व बाबांची आरती करण्यात येईल. सकाळी सात- तीस ते दहा- तिस च्या वेळात बाबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक निघेल. सकाळी 11 ते 1 या वेळेत ह भ प समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे किर्तन आणि त्यानंतर महाप्रसाद होईल.दरम्यान, भगवान भक्ती गड येथे होणाऱ्या या जन्मोत्सव सोहळ्यास बीड जिल्ह्याच्या खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्यासह आजी-माजी आमदार उपस्थित राहणार आहेत. बाबांच्या या जन्मोत्सव सोहळ्यासाठी व धार्मिक उपक्रमांसाठी भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणावर सहभागी व्हावे, असे आवाहन जय जवान ग्रुप च्या वतीने करण्यात आले आहे.

★सावरगाव च्या नवनिर्वाचित अधिकाऱ्यांचा होणार सन्मान!

राष्ट्रसंत भगवान बाबाच्या 126 व्या जन्मोत्सवापासून ते 127 वा जन्मोत्सवापर्यंत सावरगाव घाट मधून नोकरीला लागलेल्या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव केला जाणार आहे, यामध्ये सावरगाव घाट येथील मुला मुलींनी चांगलीच गगन भरारी घेत अधिकारी पदापर्यंत झेप घेतले आहेत त्यांचा गुणगौरव सोहळा पार पडणार आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!