★जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे सर्व अधिकाऱ्यांसोबत आ. बाळासाहेब अजबेंनी घेतली महत्त्वाची बैठक !
आष्टी | सचिन पवार
आष्टी पाटोदा शिरूर तालुक्यातील विविध विभागातील प्रलंबित विकास कामाबाबत बीड येथे विविध विभाग प्रमुखांची विभागणीय बैठक जिल्हाधिकारी कार्यालय बीड येथे घेण्यात आली यावेळी प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्याचा स्पष्ट सूचना यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिल्या.
आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी गुरुवार दिनांक 31 ऑगस्ट रोजी बीड येथे मृद व जलसंधारण विभाग, पैठण ते पंढरपूर पालखी मार्ग, एम एस ई बी, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना ,सार्वजनिक बांधकाम विभाग या जिल्हा विभाग प्रमुखांच्या विभागणीहाय बैठका घेतल्या. यावेळी त्यांनी पैठण ते पंढरपूर पालखी मार्गाच्या रखडलेल्या कामाबाबत माहिती घेऊन अडचणी सोडवून राहिलेले काम सुरू करण्याच्या सूचना गुत्तेदार व अधिकाऱ्यांना दिल्या, मृद व जलसंधारण विभागाच्या अंतर्गत येणारी कोल्हापुरी बंधारे सी. ना बंधारे, तलावातील पाण्यासंदर्भात माहिती घेऊन नवीन सर्वे करून तात्काळ प्रस्ताव दाखल करावेत, महावितरण एमएसईबी अंतर्गत मतदार संघातील 220 kv शिरूर पाटोदा व आष्टी येथील नवीन 33/ 11 सबस्टेशन व अतिरिक्त भार संबंधित लागणारे ट्रांसफार्मर बाबत योग्य ती कार्यवाही करून प्रस्ताव दाखल करण्याच्या सूचना दिल्या ,सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाबाबत बोलताना शिरूर येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत, आयटीआय इमारत व बजेट प्लेट मधील रस्ते बाबत चर्चा करून रखडलेली कामे सुरू करावीत तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत येणारे रस्त्यांचे कामे व झालेली टेंडर संबंधित गुत्तेदाराणा सांगून दर्जेदार कामे करून घ्यावीत, अशा विविध प्रलंबित कामा बाबत संबंधित खाते प्रमुखांची चर्चा करून लवकरात लवकर योग्य ती कार्यवाही करून कामे सुरू करावीत येणाऱ्या अडचणीं दूर करण्यासाठी प्रयत्न करून आवश्यक तेथे मी उभा राहतो परंतु कामे प्रलंबित ठेवू नका अशा स्पष्ट सूचना यावेळी आमदार बाळासाहेब आजबे यांनी सर्व जिल्हा प्रमुखांना दिल्या, यावेळी उपजिल्हाधिकारी देशमुख साहेब कार्यकारी अभियंता जलसंपदा विभाग वानखेडे साहेब तहसीलदार खेडकर साहेब कृषी अधिकारी नेटके साहेब भुमिअभिलेख शिरूर सानप साहेब एम एस ई बी चे अधीक्षक अभियंता भूमे साहेब कार्यकारी अभियंता पाटील साहेब उपजिल्हाधिकारी जाधव मॅडम सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मार्कंडे साहेब डेप्युटी इंजिनिअर जाधव साहेब प्रधानमंत्री ग्राम सडक योजने कार्यकारी अभियंता सगर साहेब डेप्युटी इंजिनिअर साळवे साहेब उपस्थित होते.
★मृद व जलसंधारण विभागाबरोबर विशेष बैठक
आष्टी मतदार संघातील मृदय जलसंधारण विभागाअंतर्गत येणाऱ्या पैठण पंढरपूर पालखी मार्ग, एम एस ई बी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, सार्वजनिक बांधकाम विभाग या जिल्हा विभागाच्या प्रमुख विभागांनी हाय बैठका घेऊन प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवण्याच्या सूचना केल्या.
★सार्वजनिक बांधकाम विभागात विशेष लक्ष!
आष्टी मतदार संघातील शिरूर येथील उपजिल्हा रुग्णालय इमारत आयटीआय इमारत व बजेट फ्लॅट मधील रस्ते बाबत चर्चा करून पकडलेली कामे सुरू करावे तर मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत रस्त्याची कामे व झालेली टेंडर सुधारित उमेदवारांना सांगून दर्जेदार करून घ्यावे अशा सूचना करून अधिकाऱ्यांना योग्य ती कारवाई करण्यास सांगितले.