11.5 C
New York
Sunday, April 6, 2025

Buy now

spot_img
spot_img

शिक्षक भरतीची पवित्र प्रणाली बंदच!

★पवित्र प्रणालीवर उमेदवारांची नोंदणी बाबत संभ्रम कायम ; ‘टीएआयटी’ उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये संताप !

बीड | प्रतिनिधी

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व खाजगी शैक्षणिक संस्थांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदांच्या भरतीला 15 ऑगस्टपासून सुरुवात करण्यात येईल व 24 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण केली जाणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत सांगितले होते. मात्र, प्रत्यक्षात पवित्र प्रणालीवर उमेदवारांची नोंदणी अजूनही सुरू करण्यात आलेली नाही व शिक्षकभरती प्रक्रियेला सुरुवात झालेली नाही, त्यामुळे शिक्षणमंत्र्यांनी विधानपरिषदेत दिलेले आश्वासन बाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
राज्यात शालेय शिक्षण विभागातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तब्बल 67 हजार पेक्षा जास्त पदे रिक्त आहेत. राज्यात शिक्षक भरती होत नसल्याने रिक्त जागांचा आकडा दरवर्षी वाढत आहे, या रिक्त पदांचा विपरीत परिणाम या शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्यावर होत आहे.दरम्यानच्या काळात शिक्षक भरतीबाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने स्थगिती दिली होती. मात्र न्यायालयाने स्थगिती हटवली असून भरती करण्यास शासनाला परवानगी दिली आहे.त्यानंतर शालेय शिक्षणमंत्री यांनी पावसाळी अधिवेशनात विधानपरिषदेत प्रश्नाला उत्तर देताना शिक्षक भरती कालबध्द कार्यक्रम जाहीर केला होता त्यात जिल्हा परिषद त्यांच्या बिंदुनामावली तपासून 15 ते 31 ऑगस्टदरम्यान शिक्षक भरतीची जाहिरात प्रणालीवर प्रकाशित करतील, 01 ते 15 सप्टेंबरदरम्यान उमेदवार प्राधान्यक्रम देतील व त्यानुसार गुणवत्ता यादी 10 ऑक्टोबरला प्रसिद्ध होईल. 11 ते 21 ऑक्टोबर दरम्यान प्रत्यक्ष नेमणुका देण्यात येईल. त्यानंतर 21 ते 24 ऑक्टोबरदरम्यान जिल्हा परिषदेत समुपदेशन करण्यात करण्यात येईल.असा वेळापत्रक दिला होता, मात्र ऑगस्ट महिना संपत आला असता तरी जाहिरात तर सोडा उमेदवारांची नोंदणी पण सुरू झालेली नाही, अशी टीका सर्व उमेदवारांकडून करण्यात येत आहे.

★ऑगस्ट महिना संपत आला तरीही पोर्टल बंद!

राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे पवित्र प्रणालीद्वारे लवकरच भरणार असल्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर नेहमीच सांगत असतात, परंतु शिक्षक भरतीची प्रक्रिया ऑगस्ट महिना संपत आला असता तरी राज्याच्या शिक्षण विभागाला पवित्र पोर्टल सुरू करण्यात यश आले नाही. शिक्षण विभागाने तत्काळ पवित्र पोर्टल सुरू करून त्यावर उमेदवारांना नोंदणीची संधी द्यावी.
– राहुल कवठेकर
अध्यक्ष,स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!