★युवकांच्या प्रश्नाबाबत नेहमीच सतर्क असणारे पै.सतीश शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश !
★महाराष्ट्रातील हजार विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न पै.सतीश शिंदे यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी निघाला !
आष्टी | सचिन पवार
कृषी विभागामार्फत कृषी सेवक या पदाचा अभ्यासक्रम व जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे त्या जाहिरातीमध्ये अभ्यासक्रम फक्त मराठी मध्ये देण्यात आलेला आहे तसेच कृषी यातांत्रीक घटकातील प्रश्न संख्या 60 असून सदर प्रश्न केवळ मराठी मध्ये विचारले जाणार आहेत या कृषी सेवक पदासाठी पदविका आणि पदवी या दोन्ही शैक्षणिक पात्र असणारे विद्यार्थी पात्र आहेत पण ही परीक्षा मात्र मराठी मध्येच होणार असल्याचं कळाल्यानंतर कृषी पदवीधारक विद्यार्थ्यांकडून याबाबत वारंवार तक्रारी मिळेल व निवेदन देऊन ही परीक्षा मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत घेण्यात यावी अशी मागणी केली होती याचा पाठपुरावा विद्यार्थ्यांकडून पैलवान सतीश आबा शिंदे यांच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू होता आबाकडून धनंजय मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली गेली होती त्या मागणीला आज यश मिळालेला आहे.
कृषी पदवीधारक आणि पदविक विद्यार्थ्यांना विचारात घेऊन कृषी सेवक पदाचे तांत्रिक 60 प्रश्न मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेत विचारण्यासाठी निवेदन आणि मागणी केली गेली होती कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सतीश आबा शिंदे यांच्या माध्यमातून कृषी पदवीधर विद्यार्थी मागणी करत होते सतीश आबा शिंदे हे नेहमीच विद्यार्थ्यांसाठी युवकांसाठी आवाज उठवत आले आहेत. या कृषी पदवीधर विद्यार्थ्यांसाठी सुद्धा त्यांनी कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे पत्रव्यवहार करून मागणी केली होती त्या निवेदनाची दखल घेत नामदार धनंजय मुंडे यांनी संबंधित विभागाला आदेश देऊन ही परीक्षा धोनी मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये घेण्यात येईल असं कळवले आहे त्याबद्दल नामदार धनंजय मुंडे यांचे राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सतीश आबा शिंदे व कृषी पदवीधर विद्यार्थ्यांकडून जाहीर आभार व्यक्त केले गेले आहेत.
★महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा
कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक परीक्षा आर्थी विद्या उमेदवाराकडून मुक्त नमूद पदाची परीक्षा ही दोन्ही भाषेमध्ये म्हणजेच मराठी आणि इंग्रजी भाषेमध्ये होण्यासंदर्भात आयुक्ताला स्तरावर वारंवार निवेदन नियंत्रण केली होती याचा पाठपुरावा जिल्हा परिषद सदस्य पै.सतीश शिंदे यांच्या माध्यमातून कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सुरू होता त्यांच्या पाठपुराव्याला आज यश मिळाले असून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे.
★युवकांच्या प्रश्नासाठी नेहमीच तत्पर असणारे सतीश शिंदे
युवकांचा कोणताही प्रश्न असो मग खेळा संदर्भात असेल किंवा शिक्षणा संदर्भातील असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य सतीश आबा शिंदे नेहमीच सकारात्मक भूमिका घेऊन त्यांच्या प्रश्नावर आवाज उठवत आले आहेत आणि त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पाठपुरावा करत राहिले आहेत. कृषी विभागातील महत्त्वाचे मुद्द्यावर त्यांनी कृषिमंत्र्याकडे निवेदनाद्वारे मागणी करून विद्यार्थ्यांचा जिव्हाळ्याचा हक्काचा प्रश्न सोडून घेतल्याबद्दल विद्यार्थ्यांकडून पै.सतीश आबांची सुद्धा खूप खूप आभार व्यक्त केले जात आहेत.
★कृषी सहाय्यक पदासाठी कृषी सेवक पदांची परीक्षा मराठी इंग्रजी मध्ये होणार
भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट संवर्गातील कृषी सेवकांची रिक्त पदे कृषी सेवक म्हणून निश्चित वेतनावर सरळ सेवेने भरण्यासाठी प्रसिद्ध करण्यात आलेले असून ही परीक्षा मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषेत घेण्यात येण्याचे आदेश आयुक्त कृषी महाराष्ट्र राज्य पुणे स्तरावरून घेण्यात आले आहेत.