19.3 C
New York
Monday, September 8, 2025

Buy now

spot_img
spot_img

पूजाताई मुळे आनंदवाडी गाव ऑनलाइन पोर्टलवर!

★शेतकऱ्यांच्या समस्या सुटल्या धन्यवाद ” पूजाताई “

गेवराई | प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील आनंदवाडी हे गाव सर्व गोष्टी पासून वंचित असल्यासारखंच होतं खास करून शेतकऱ्यांना ऑनलाइन च्या कामात नेहमीच अडथळे येत होते मग सातबारा असेल किंवा पिक पेरा भरण्यासाठी असेल किंवा इतर कोणतेही ऑनलाइन चे काम करायचे असतील त्या ठिकाणी आनंदवाडी गाव ऑनलाईन पोर्टलवर नसल्यामुळे शेतकऱ्यांना अनेक गोष्टी पासून वंचित रहावे लागत होतं परंतु पूजाताई मोरे यांच्या पाठपुराव्यामुळे आनंदवाडी गाव ऑनलाईन पोर्टलवर आले आहे त्यामुळे सर्व ग्रामस्थ त्यांचे धन्यवाद देत आहेत.
शेतकऱ्यांचा आवाज आणि आधार म्हणून पूजाताई मोरे यांच्याकडे पाहिलं जातं अनेक वर्षापासून शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी नेहमीच आवाज उठवत आले आहेत. गेवराई च्या आनंदवाडी येथील शेतकऱ्यांचा ऑनलाइन पोर्टलचा मोठा प्रश्न अनेक वर्षापासून रेंगाळत होता काल पूजाताई स्वतः शेतकऱ्यांसोबत जाऊन शेतकऱ्यांचा ऑनलाइन पोर्टलचा प्रश्न तात्काळ सोडून घेतला. शेतकऱ्यांच्या ऑनलाइनच्या अडचणी आता कायमचा दूर झाले आहेत सर्व आनंदवाडीच्या शेतकऱ्यांच्या वतीने पूजाताईचे खूप खूप धन्यवाद सुद्धा व्यक्त केले जात आहेत.

 

★शेतकऱ्यांना अडचणी येईपर्यंत अधिकारी करतात काय ? पूजा मोरे

शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो परंतु शेतकऱ्यांपुढे अडचणी असताना अधिकारी वर्ग आणि पुढारी वर्ग नेमकं करतो तरी काय असा प्रश्न नक्कीच उपस्थित होतोय. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना अडचणी येणार नाही यासाठी अधिकारी वर्गाने थोडं दक्ष रहावे..
– पूजाताई मोरे
प्रदेशाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!