11.9 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

आष्टीतील राधिका लाॅजवरील वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश!

★दोन महिलांची सुटका , लाॅज मालकावर गुन्हा दाखल !

आष्टी | प्रतिनिधी

येथील तहसील कार्यालयाजवळील राधिका लॉजवर राजरोसपणे सुरु असलेल्या वेश्या व्यवसायचा आष्टी पोलिसांनी गुरुवारी (ता.२४) रात्री पर्दाफाश केला असून या प्रकरणी दोन महिलांची सुटका केली आहे. तसेच लॉज चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आष्टी शहरातील काही लाॅजवर वेश्याव्यवसाय सुरु असल्याची चर्चा मागिल काही दिवसांपासून सुरू होती.याबाबत आष्टी पोलिसांना माहिती मिळताच नगर जामखेड मार्गावरील व तहसिल कार्यालयासमोर असणाऱ्या राधिका लॉजवर डमी ग्राहक पाठवून खात्री केली. गुरुवारी (ता.२४) रात्री ९.३० च्या सुमारास पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेत छापा टाकला असता लाॅजचालक लहू सानप (रा.कासेवाडी, ता आष्टी) हा सांगली तसेच कर्नाटक राज्यातील महिला आणून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय चालवताना आढळून आला. यावेळी येथील दोन पिडीत महिलांची पोलिसांनी सुटका केली आहे. याप्रकरणी लहु सानप याच्यावर आष्टी पोलिस ठाण्यात सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस हे करत आहेत. सदरील कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संतोष खेतमाळस, सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख,भाऊसाहेब गोसावी,पोलीस कॉन्स्टेबल सचिन पवळ, पोलीस शिपाई एम एस शेख, दादासाहेब भगत आदींनी केली.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!