लिट्ल फ्लॉवर इंग्लीश स्कुल, हे पाटोदा शहरातील एकमेव दर्जेदार इंग्रजी शिक्षण देणारी शाळा
लोकवास्तव विशेष…
पाटोदा शहरात सन 2002 मध्ये लिट्ल फ्लॉवर इंग्लिश स्कुलची’ स्थापना अगदी मोजक्याच विद्यार्थ्या सोबत झाली. ग्रामीण भागातील सर्व सुविधा संपन्न अशा या शाळेची गुणात्मक व संख्यात्मक वाटचाल आज सुरू झालेली आहे. शाळेचे प्राचार्य श्री. पठाण सर यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या शाळेचे हे शिक्षण ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्याचे काम उदात्त हेतुने अविरत चालू आहे.
लिट्ल फ्लॉवर इंग्लिश स्कुल पाटोदा या शाळेला एकवीस वर्षाची गौरवशाली परंपरा आहे. स्वच्छ व भव्य प्रांगण, प्रसन्न वातावरण, सावली देणारे डेरेदार वृक्ष, भरपूर विद्यार्थी पटसंख्या, कल्पक व दुरदृष्टी चे शिक्षक स्टाफ,तसेच कष्टाळु कर्मचारी हे या शाळेचे ठळक वैशिष्टये आहेत. ही शाळा महाराष्ट्रातील इतर दर्जेदार शिक्षण देणाऱ्या शाळेच्या दर्जाचे शिक्षण पाटोदा शहरात जवळपास वीस वर्षांपासून देत आलेली आहे. या शाळेने आतापर्यंत खुप गुणवान विद्यार्थी घडवले आहेत. शाळेचे संस्थापक श्री पठाण सर हे इंग्रजीचे गाढे अभ्यासक असून, शाळेमधील उच्च शिक्षित व उत्साही शिक्षक वर्ग, उत्तम पदवीधर जागृत सुशिक्षित पालक व संस्थेचे पदाधिकारी या सर्वाच्या मेहनतीमुळे शाळा यशस्वी वाटचाल करत आहे.शाळेमध्ये संस्कार, मुल्यशिक्षण, सामाजिक जाणीव, संवेदनशीलता, व्यवहार कौशल्ये, यश अपयश पचविणे या गोष्टी जाणीवपुर्वक विविध उपक्रमातून विद्यार्थ्यांना शिकवल्या जातात.विद्यार्थी केंद्रबिंदू मानुन विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे हे या शाळेचे उदिष्ट आहे. यासाठी सर्व शिक्षक तज्ञ मार्गदर्शकाची चोख भुमिका बजवतात. विद्यार्थ्यांच्या शारिरीक, मानसिक, बौध्दिक सामाजिक नैतिक व भावनिक विकास करण्यासाठी शाळेमध्ये विविध उपक्रम राबवले जातात. बाहयस्पर्धा परिक्षानाही वाव दिला जातो. उदा- शिष्यवृत्ती परिक्षा एम.टी.एस. , चित्रकला स्पर्धा, नवोदय परीक्षा, प्रज्ञाशोध परिक्षा या सारख्या विविध स्पर्धा परिक्षा आयोजित केल्या जातात. बीड फेस्टिवल शारदामहोत्सव, शिवजयंती उत्सव या मध्येही विद्यार्थी सहभाग नोंदुचन यश संपादन करतात.. अभ्यासाबरोबरच मुलांच्या आरोग्य विषयी तज्ञ डॉक्टराकडून शाळेमध्ये मार्गदर्शन व तपासणी केली जाते. अभ्यासाबरोबरच कृतीची जोड देऊन मुलांच्या सर्वागीण विकास हा एकच ध्यास मनात ठेवला जातो लिटल फलॉवर इंग्लिश स्कुल मध्ये विविध क्रीडा स्पर्धाचे आयोजन केले जाते. या शाळेचे विविध क्रीडा स्पर्धे मध्ये सांघिक व वैयक्तिक जिल्हापातळीवर यश मिळवले आहे. त्याप्रमाणे शाळेमध्ये विविध उपक्रम शालेय सहल, यांचेही आयोजन केले जाते.आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या शाळेची असलेली एस.एस.सी परिक्षेची 100 टक्के निकाल देऊन शाळेतील विद्यार्थ्यानी टक्केवारी दरवर्षी उचावत 100 टक्के निकालाची परंपरा कायम ठेवून शाळेच्या प्रगतीचा आलेख उंचावला आहे. लिटिल फ्लावर इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी नवीन वर्षानिमित्त आनंद मेळावा आयोजित करून मुलांना नवनवीन संधी उपलब्ध करून देण्यात येते तसेच तसेच शैक्षणिक वर्ष 2022-23 पासून वर्ग सातवी पासुनच मुलांना स्पर्धा परीक्षा जे इ इ, सी ए टी ,आणि नीट या परीक्षेची तयारी म्हणून अभ्यासक्रमातच फाउंडेशन कोर्स ची सुरुवात केली आहे लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल ला 21 वर्षे पूर्ण झाले असून आतापर्यंत शाळेच्या एकूण दहावी बोर्ड च्या 11 बॅचेस यशस्वीरित्या शंभर टक्के निकाल देऊन यशस्वी झाल्या आहेत. तसेच आतापर्यंत शाळेचे जवळपास 32 मुले वैद्यकीय शिक्षणामध्ये म्हणजेच डॉक्टर्स झालेले आहेत जवळपास 50 हून अधिक मुले इंजिनियर्स पदवी प्राप्त केलेले आहे. त्याचप्रमाणे बरेच मुलं इंग्रजी भाषेच्या संपूर्ण ज्ञानामुळे वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चांगल्या पदावर कार्यरत आहेत. शाळेमध्ये प्रोजेक्टर सहाय्याने व डिजिटल पद्धतीने मुलांना शिक्षणाची गोडी निर्माण करून त्यांना आधुनिक शिक्षण दिले जाते. लिटल लिटल फ्लॉवर इंग्लिश स्कूल हे पाटोदातील एकमेव दर्जेदार इंग्रजी माध्यमाची शाळा म्हणून ओळखले जाते. विविध उपक्रम शाळेमध्ये नेहमीच आयोजित केले जातात त्याचबरोबर मुलांना नियमित अभ्यासाची गोडी लागण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिले जाते त्यामुळे दरवर्षी या शाळेचे प्रवेश वाढत आहेत आणि आणि यापुढेही दरवर्षी नवीन शैक्षणिक धोरणानुसार शाळेमध्ये नवीन अभ्यासक्रम आणि शिक्षकांना प्रशिक्षण देऊन अपडेट केले जाते यापुढेही शिक्षणाची दर्जेदार शिक्षणाची वाटचाल शाळेला अशीच राहील आणि आणखी दर्जेदार शिक्षण देण्याचा संकल्प शाळेचे संस्थापक व प्राचार्य श्री पठाण सर यांनी केला आहे. मागील पाच वर्षांपासून शाळेने सीबीएसई तसेच एनसीईआरटी या अभ्यासक्रमावर आधारित शिक्षकांना प्रशिक्षण व मुलांना शिक्षण दिले जात आहे शाळेचे अशीच प्रगती होत राहो अशीच आमची शुभेच्छा!
– कृष्णा सानप सर
एम. ए. एम. एड. एमफिल.