18.9 C
New York
Sunday, September 7, 2025

Buy now

spot_img
spot_img

मोहटा देविच्या दर्शनासाठी चाललेल्या गाडीचा भीषण अपघात ; दोघांचा मृत्यू, सहा जखमी!

★चालकाचा ताबा सुटल्याने गाडीचा भीषण अपघात ; गाडीचा चक्काचूर !

शिरूर कासार | जीवन कदम

 

तालुक्यातील तांगडगांव येथील एक कुटूंब मोहटा देवीच्या दर्शनाला जात असतांना मानूरच्या पुढे साधारण एक किलोमिटर अंतरावर शेंदूरकर यांचे घराजवळ गाडीचा भिषण अपघात झाला त्यात गाडीचा चक्काचूर झाला तर दोघाचा जागिच मृत्यू झाला तर अन्य सहा गंभिर जखमी झाल्याने पुढील उपचारासाठी बीड शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले .घटना स्थळी पोलीस हजर झाले ,पंचनामा केल्यानंतर मयताचे शवविच्छेदन प्राथमीक आरोग्य केंद्रात वैद्यकिय अधिकारी डॉ प्रगती पवळ यांनी केले ,मयताचा भाऊ कृष्णा अंबादास नाईकनवरे यानी पोलीसात खबर दिली.
ऊसतोड मजुर म्हणून काम करत असलेले नाईकनवरे कुटूंब शुक्रवारी मोहटा देवी दर्शनासाठी ईंडीका व्हिस्ट गाडी घेऊन जात असतांना सकाळी अकराच्या सुमारास भरधाव वेगावर नियंत्रण मिळवता न आल्याने झाडावर धडकली त्यात गाडीचा चक्काचूर झाला ,गाडी चालवत असलेले गोकुळ बापुसाहेब नाईकनवरे वय 40 वर्ष यांचेसह त्यांची आठ महिण्याची भाची दिव्या आदिनाथ मडके रा. देवी निमगाव यांचा जागीच मृत्यू झाला तर मयताची आई लताबाई अंबादास नाईकनवरे वय 60 वर्ष, पत्नी उषाबाई गोकुळ नाईकनवरे वय 35 वर्ष ,दादा गोकुळ वय 14 वर्ष ,प्रगती गोकुळ वय 15 वर्ष ,कोमल आदिनाथ मडके वय 24 मयत बाळाची आई देवीनिमगांव व बाळू मच्छिंद्र सटले वय 18 वर्ष रा. जोडवाडी मयताचा भाचा हे सर्वजन गंभिर जखमी झाले असुन त्यांना तातडीने बीडला शासकिय रूग्णालयात पाठवण्यात आले आहे. अपघात घडला नेमके त्यावेळी शिरूर पोलीस स्टेशनचे ट्रेनी पी एस आय भाऊसाहेब शिरसाट शिरूरला येत होते , त्यामुळे पुढील सुत्र तातडीने हालले ,0अपघात स्थळी पोलीस निरिक्षक धोकरट भेट दिली सोबत पोलीस जमादार सतिष राऊत, माने होते. खबरीवरून अपघाताची नोंद घेऊन पुढील तपास पोलीस करणार आहेत. ऊसतोड मजुराचे कुटूंबच या संकटात सापडले असुन घरातील कर्ता माणूस अपघातात मृत्यू झाला असुन पत्नी व मुल जखमी झाले असल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. वेगावर नियंत्रण न ठेवल्यास अशा प्रसंगाला सामोरे जाण्याची वेळ येते ही वेळ येऊ नये यासाठी वाहन चालवताना आपला जिव महत्त्वाचा असतो याचे भान प्रत्येकाने ठेवले पाहिजे. तागडगावांत शोककळा पसरली आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!