★पवारसाहेबांना उत्तर देण्याची आपली लायकी नाही – राजेश्वर चव्हाण
★बीडच्या सभेसाठी पाटोद्यात विश्रामगृहावर महत्त्वाची बैठक संपन्न!
पाटोदा | सचिन पवार
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची बीड येथे होणारी 27 ऑगस्ट ची सभा ही ना भूतो ना भविष्य अशी होणार असल्याने प्रत्येक मतदारसंघांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या जात आहेत आज पाटोदा येथील विश्रामगृहावर पाटोदा तालुक्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी प्रमुख मार्गदर्शक आमदार बाळासाहेब आजबे काका व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर आबा चव्हाण हे होते.
बीड येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या स्वाभिमान व विकास सभेच्या निमित्ताने आष्टी मतदार संघातून वीस तीस हजार नागरिकांची उपस्थिती रहावी यासाठी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बीड येथील सभेच्या निमित्ताने पाटोदा विश्रामगृहावर आयोजित केलेल्या बैठकीत आमदार बाळासाहेब आजबे काका बोलताना म्हणाले राष्ट्रवादीच्या सभेचे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन समजून आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे बीड जिल्ह्याचा खुंटलेला विकास पुढे घेऊन जाण्यासाठी ही सभा महत्त्वाची ठरणार असल्याने आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन केले तर राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बैठकीमध्ये बोलताना म्हणाले की स्वाभिमानाची आणि विकासाची आहे पवार साहेबांना उत्तर देण्याची आपली लायकी नाही त्यामुळे या सभेकडे पवार साहेबांच्या सभेला उत्तर देणारी सभा म्हणून पाहू नका तर बीड जिल्ह्याचा विकास वाढण्यासाठी आपल्या अडचणी सोडवण्यासाठी ही सभा महत्त्वाची आहे असे त्यांनी सांगितले. यावेळी सहकार महर्षी रामकृष्ण बांगर साहेब, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष दीपक दादा घुमरे, गुलाबभाऊ घुमरे, विठ्ठल सानप, अण्णासाहेब लवांडे, युवक राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष युवराज, यांच्यासह पाटोदा तालुक्यातील अमळनेर, पारगाव,डोंगरकिन्ही गटातील प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते महत्त्वाचे नेते मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आभार सज्जाद सय्यद यांनी केले.
★बीडची सभा स्वाभिमानाची आणि विकासाची!
बीड येथे होत असलेल्या उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व मंत्रिमंडळाच्या महत्त्वाच्या सभेसाठी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यासाठी बाळासाहेब आजबे काका व राजेश्वर चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही बैठक स्वाभिमानाची आणि विकासाची असल्याने आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले.
★फर्स्ट इम्प्रेस इज लास्ट इम्प्रेशन!
आमदार बाळासाहेब आजबे काका व जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी बैठकीत आलेल्या सर्वच पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना सांगितलं ही आपली बैठक म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन समजून आपण जास्तीत जास्त संख्येने या सभेसाठी उपस्थित राहावे.. येताना सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी आणि दुसऱ्याची घ्यावी. विकासाच्या बाबतीत आपण अधिक महत्त्वकांक्षी राहून होणाऱ्या सभेतून आपल्याला अधिक विकास खेचून आणता येईल यासाठी आपली ताकद दाखवण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे देखील आवाहन केले.