14.1 C
New York
Tuesday, April 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

चोरांचा सुळसुळाट ; घरफोडीचे प्रमाण वाढले!

★लांबरवाडी, गवळवाडी, कुसळंब, पिठी सह अन्य ठिकाणी घरफोडी !

पाटोदा | प्रतिनिधी

पाटोदा तालुक्यात अनेक ठिकाणी घरपोडीच सत्र सुरू झाले आहे. पिठी, गवळवाडी, कुसळंब, लांबरवाडी येथे दिवसाढवळ्या घरफोडी झाल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. लाखो रुपयांचं मुद्देमाल तसेच लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे सुद्धा समोर आले आहे. एक प्रकारे चोरट्यांनी प्रशासनाच्या डोळ्यात धुळ फेक करत घरफोडीचे सत्र हाती घेतले आहे. आता प्रशासनाबरोबर नागरिकांना देखील दक्ष राहण्याचे आव्हान करण्यात येत आहे.
लांबरवाडी येथे दिवसाढवळ्या घर फोडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाने दक्ष राहण्याचे आवाहन केले असून नागरिक सुद्धा सतर्क झाले आहेत. आता पोलीस प्रशासनाने गंभीर पावले उचलून अशा दिवसाढवळ्या घर फोडी करणाऱ्या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची नागरिकांमधून मागणी होत आहे.

★लांबरवाडी, कुसळंब, गवळवाडी मध्ये दिवसाढवळ्या घरफोडी!

आटेगाव पुठ्यामध्ये चोरांचा सुळसुळाट वाढला आहे. गवळवाडी कुसळंब लांबारवाडी येथे दिवसाढवळ्या चोरांनी घरफोडी केल्याने नागरिकांमध्ये गबरहाट पसरली आहे. पोलीस प्रशासनाने आता कठोर पावले उचलून नागरिकांना आधार द्यावा. दिवसाढवळ्या जर घरे फुटत असतील तर नागरिकांनी करायचं काय ? कुणाच्या भरोशावर राहायचं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

★पाटोदा तालुक्यात घरफोडी टोळी सक्रिय!

पाटोदा तालुक्यामधील पिठी, गवळवाडी, कुसळंब लांबारवाडी सह आटेगाव कुठे मध्ये बऱ्याच ठिकाणी घरपोडी झाल्याच्या तक्रारी समोर आले आहेत. दिवसा ढवळ्या घरे फुटत असल्याने नागरिकांमध्ये घबराहाट पसरली आहे. घरफोडी करणारी टोळी दिवसाढवळ्या घरी फोडीत आहे. प्रशासनाने अधिक सक्रिय राहून नागरिकांना आधार देण्याची मागणी होत आहे. या टोळीचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची सुद्धा मागणी होत आहे.

★लाखो रुपयाची लूट तर लाखो रुपयांचा नुकसान!

गवळवाडी, कुसळंब, लांबरवाडी, पिठी येथे झालेल्या घर फोडी मध्ये लाखो रुपयांचा मुद्देमालासह लाखो रुपयांचे नुकसान केल्याच्या तक्रारी सुद्धा समोर येत आहेत. पाटोदा तालुक्यात घरफोडीचे सत्र सुरू झाल्याने लाखो रुपयाचा मुद्देमाल रोख रक्कम तर लाखो रुपयांचं नुकसान झाल्याने नागरिकांमध्ये भीतीच वातावरण आहे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!