9.7 C
New York
Wednesday, April 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

सोशल मीडिया जरा जपून ; असभ्य पोस्ट भोवणार!!

★असभ्य पोस्ट केल्यानंतर माफी नाही, सुटका नाही, परिणाम भोगावे लागणार : सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश !

★सोशल मीडियावरील फेक अकाउंट वरून असभ्य पोस्टवर बसणार अंकुश !

★तामिळनाडूचे अभिनेते एसव्ही शेखर यांच्याविरुद्ध खटला रद्द करण्यास नाकार !

★अपमानास्पद पोस्ट टाकल्यास होणार शिक्षा : सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली : वृत्तांत

सोशल मीडियावर असभ्य आणि अपमानास्पद पोस्ट टाकणाऱ्यांना शिक्षा होणे आवश्यक असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. असे लोक माफी मागून फौजदारी कारवाईतून सुटू शकत नाहीत. त्यांना त्यांच्या कृत्याचे परिणाम भोगावे लागतील, असेही कोर्टाने म्हटले.शुक्रवारी म्हणजेच 18 ऑगस्ट रोजी ही टिप्पणी करताना सर्वोच्च न्यायालयाने तामिळनाडूचे अभिनेते आणि माजी आमदार एसव्ही शेखर (72 वर्षे) यांच्याविरुद्ध दाखल केलेला खटला रद्द करण्यास नकार दिला. महिला पत्रकारांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरण 2018 चे आहे. शेखर यांनी फेसबुकवर महिला पत्रकारांना लक्ष्य करत आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. एका महिला पत्रकाराने तामिळनाडूचे तत्कालीन राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्यावर गालाला स्पर्श केल्याचा आरोप केला होता. महिला पत्रकाराच्या या आरोपाबाबत शेखर यांनी मत मांडले होते.त्यांच्या या पोस्टनंतर बराच वाद झाला होता. द्रमुकने त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शेखरने नंतर माफी मागितली आणि पोस्ट डिलीट देखील केली, परंतु या पोस्टबद्दल तामिळनाडूमध्ये त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते.

★कोर्टात काय घडले…

शेखरचे वकील त्यांना (शेखर) चूक लक्षात येताच लगेच त्यांनी पोस्ट हटवली आणि बिनशर्त माफी मागितली. अभिनेत्यांनी दुसऱ्याची पोस्ट शेअर केली होती. त्यावेळी डोळ्यात औषध टाकल्यामुळे त्यांची दृष्टी धूसर झाली होती. यामुळे त्यांना पोस्टमध्ये काय लिहिले आहे ते पाहता आले नाही. अनेक लोक शेखर यांना सोशल मीडियावर फॉलो करतात, त्यामुळे ही पोस्ट शेअर करताच व्हायरल झाली.

★सर्वोच्च न्यायालय म्हणाले !

न्यायमूर्ती बीआर गवई आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार म्हणाले, ‘शेखर यांनी पोस्टचा मजकूर न वाचता शेअर कसा केला?’ त्यानंतर या प्रकरणातील त्यांच्याविरुद्धच्या कारवाईत हस्तक्षेप करण्यास नकार दिला. न्यायालयाने कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्यास सांगितले.

★सुप्रीम कोर्ट काय म्हणताय!

लोकांनी सोशल मीडियाचा वापर करताना खूप लक्ष दिले पाहिजे. सोशल मीडियाचा वापर गरजेचा नाही, पण जर कोणी केला तर त्याची चूक झाली तर त्याची खापर सहन करायला तयार राहायला हवे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!