14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

‘मुख्य’ चे ‘उप’ झाल्याने फडणवीस वैफल्यग्रस्त!

★’देशी’ नशेत त्यांच्या झोकांड्या जात आहेत; ठाकरे गटाचा सामनातून हल्लाबोल !

मुंबई : वृत्तांत

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने देवेंद्र फडणवीसांना अस्वस्थ केले. ‘उप’ची नशा ही ‘देशी’ बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांड्या जात आहेत. फडणवीस, सांभाळा!, अशा शब्दांत आज ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या सामनातून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका करण्यात आली आहे.
सामनात ठाकरे गटाने म्हटले आहे की, देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते.सामनात म्हटले आहे की, उपमुख्यमंत्री फडणवीस, ते सदैव अर्धग्लानी अवस्थेत आहेत. काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच,’’ असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. गेल्या वर्षभरात त्यांचे हे ‘पुनः पुन्हा’ प्रकरण इतक्या वेळा झाले आहे की, जनतेच्या शब्दकोशातून ‘पुन्हा’ हा शब्द बाद होण्याची शक्यता आहे.

★बोलण्यात इमानदारीचा जोश नाही

सामनात म्हटले आहे की, फडणवीस हे मुख्यमंत्री म्हणून पुन्हा येणार होते, पण त्यांच्या हायकमांडने त्यांना ‘उप’ म्हणून पुन्हा पाठवले. आज हे ‘उप’ एका अननुभवी, बेइमान, भ्रष्ट माणसाच्या हाताखाली काम करीत आहेत. त्यांच्या बोलण्यात इमानदारीचा जोश नाही. दिल्लीश्वरांनी 2019मध्ये बेइमानी केली नसती तर महाराष्ट्रात फडणवीस सन्मानाने पुनः पुन्हा आलेच असते आणि फौजदाराचा जमादारही झाला नसता हे सत्य ‘प्यारे’ फडणवीस नाकारू शकत नाहीत.

★फडणवीस बिनपगारी अधिकारी

सामनात म्हटले आहे की, फडणवीस पुन्हा आले हे सत्य नाही. ते अजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली. फडणवीस हे भांबावलेल्या मनःस्थितीत असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळय़ा भररस्त्यांवर हल्ले होत आहेत. खुनाखुनी सुरू आहे. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे सुरू ठेवावे हे योग्य नाही.

★पवारांमुळे फडणवसांची अवस्था बीकट

सामनात म्हटले आहेकी, फडणवीस ‘उप’ म्हणून पुन्हा आले. ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही. आता दिल्लीश्वरांनी अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीसांची अवस्था बिकट केली. ‘‘मी पुन्हा पुन्हा पुन्हा ‘उप उप उप उप’ म्हणून आलो’’ हे घोषवाक्य अजित पवारांना शोभते. पुन्हा ज्या पवारांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत? अजित पवार व मुख्यमंत्री शिंदे यांच्यात संघर्ष आहे. कमजोर, अस्थिर मुख्यमंत्र्यांच्या हाताखाली काम करणार नाही, अशी भूमिका अजित पवार 2019 पासून घेत आहेत.

★दुश्मनाच्या नशिबीही असे नसावे

सामनात म्हटले आहे की, शिंदे-पवारांच्या वादात जिल्हय़ांना पालकमंत्री मिळू शकले नाहीत, मंत्रिमंडळ विस्ताराचे कोट व अनेकांची बाशिंगे वाया गेली आणि फडणवीस त्यावर काहीच करू शकले नाहीत. कारण दोघांच्या भांडणाची मजा पाहणे, कोंबडय़ांच्या झुंजीत पुंपणावर बसणे हेच ‘उप’ धोरण त्यांनी स्वीकारलेले दिसते. भ्रष्टाचाराचे, महिलांवरील अत्याचाराचे आरोप असलेले लोक फडणवीस यांचे मंत्रिमंडळातील सोबती आहेत व या महान ‘उप’ महोदयांना गटारगंगेस अत्तराची नदी म्हणावे लागत आहे. हे असे पुन्हा पुन्हा येणे दुश्मनाच्या नशिबीही नसावे.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!