★पंतप्रधानांसह मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्री यांच्या फोटोची महाआरती !
शिरूर कासार | जीवन कदम
शहरासह तालुक्याच्या विविध प्रश्नावर लक्ष केंद्रीत करण्यासाठी मनसेने जिजामाता चौकात पंतप्रधानासह महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो ठेऊन सरकारची आरती करत अनोखे आंदोलन केले ,आरती आंदोलनाने लक्ष वेधून घेतले होते .मनसेचे तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांनी प्रामुख्याने शहरातील मुख्य रस्त्याची झालेली दुरावस्था व नागरीकांना होणारा त्रास त्याचबरोबर राजुरी ते चिंचपूर रस्त्याच्या अर्धवट कामे दर्जेदार पुर्ण करा अन्यथा आंदोलन करण्याचा निवेदनाद्वारे उपअभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग पाटोदा यांचेकडे केली ,आंदोलनापुर्वी कारवाही न झाल्याने शुक्रवारी साडेदहा वाजता जिजामाता चौकात पंतप्रधान ,महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे फोटो खुर्चीवर ठेऊन पुजन करून आरती केली .आपल्या तिव्र भावना व्यक्त करतांना रस्त्याशिवाय पिण्याच्या पाण्यासाठी नाथसागराचे पाणी, शहरातील रस्ते, नाल्या , विजपुरवठा कौशल्य आधारीत शिक्षण सोय आदी प्रश्नाबाबत भावना व्यक्त करत नागरीकांचे लक्ष वेधले, झोपेचे सोंग घेऊन नका जागे व्हा असे आवाहन देखील केले. जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग पाटोदा यांचे वराती मागुन घोडं ! आंदोलनाची पुर्व कल्पना देऊन देखील संबंधीत विभागाने आंदोलनाबाबत पत्राद्वारे कार्यरत सांगत आंदोलन करू नये असे कळवले मात्र हे पत्र आंदोलन झाल्यानंतर सोपान मोरे यांना देण्यात आले म्हणजेच वरातीमागुन घोडे ,प्रत्यक्षात या पत्रावर चौदा तारीख आहे मग चार दिवस हे पत्र कुठे थांबले होते असा प्रश्नही सोपान मोरे यांनी उपस्थित केला.निधी मागणी केलेली आहे तो उपलब्ध झालेवर काम करण्यात येईल असे गोल गोल उत्तराचे पत्र दिले आहे.यावरून बांधकाम विभागाचे कामाबाबत गांभिर्य नसल्याचे लक्षात येते. आता पुढे अधिक तिव्र आंदोलन करण्याचा इशारा मोरे यांनी दिला आहे.