★पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्याच्या निषेधार्थ मराठी पत्रकार परिषद पाटोदा आक्रमक !
पाटोदा | प्रतिनिधी
पत्रकारांना संरक्षण मिळावे, यासाठी पत्रकार संरक्षण कायदा अंमलात आल्यानंतरही पत्रकारांवरील हल्ले वाढतच राहिले आहेत. जबाबदार लोकप्रतिनिधींकडूनही पत्रकारांवर हल्ले होत असल्याने त्या निषेधार्थ बीड जिल्हा मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दि.17 ऑगस्ट रोजी दुपारी 10:30 वाजता बीड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करुन निदर्शने करण्यात आले.
पाचोरा जि.जळगाव येथील पत्रकार संदीप महाजन यांना आमदार किशोर पाटील यांनी दिलेल्या अर्वाच्च शिव्या आणि नंतर त्यांच्यावर भ्याड करण्यात आला. या घटनेनंतर मराठी पत्रकार परिषदेची तात्काळ बैठक होवून परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांनी पाचोर्यातील घटनेची सविस्तर माहिती देऊन सर्व पत्रकार संघटनांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. त्यानुसार राज्यातील बहुतांशी पत्रकार संघटना एकत्र आल्या 17 ऑगस्ट रोजी राज्यभर निदर्शने करण्याचे ठरले. पत्रकारांचे संरक्षण करण्यास निष्प्रभ ठरलेल्या पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायदा असला तरी त्याची अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारांवरील हल्ल्याच्या घटना वाढल्या आहेत. राज्यात गेल्या वर्षभरात 46 पत्रकारांवर हल्ले झाले आहेत. पोलीस पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हे दाखल करायलाही टाळाटाळ करत असल्याने हा कायदा सर्वार्थाने कुचकामी ठरत आहे. यामुळेच पत्रकार संरक्षण कायदयाची होळी करण्यात आली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे बीड कोषाध्यक्ष छगन मुळे, शेतकरी कामगार पक्षाचे भाई विष्णुपंत घोलप, पाटोदा तालुकाध्यक्ष सचिन पवार, कादर मकरानी, हमीदखान पठाण, दयानंद सोनवणे, डिजिटल मीडिया तालुकाध्यक्ष जावेद शेख, सचिव अजय जोशी, अनिल गायकवाड, कार्याध्यक्ष सोमनाथ खंडागळे, इमरान शेख, नानासाहेब, दत्ता देशमाने, अशोक भवर, साजिद सय्यद, प्रभाकर सुळे, सचिन गायकवाड, बबन पवार, दिगंबर नाईकनवरे, फयाज सय्यद , रियाज सय्यद, हरिदास शेलार, जाकीर पठाण यांच्यासह पत्रकार उपस्थित होते.
★पत्रकार संरक्षण कायद्याची होळी होणे सरकारचे अपयश – सचिन पवार
मराठी पत्रकार परिषदेच्या एकजुटीमुळे पत्रकार संरक्षण कायदा अमलात आला परंतु त्याची म्हणावा तेवढी अंमलबजावणी होत नसल्याने पत्रकारावर हल्ले वाढत आहेत पत्रकारांच्या हल्ल्याबाबत मराठी पत्रकार परिषदेचे विश्वस्त एसएम देशमुख नेहमीच आवाज उठवत आहेत. येणाऱ्या काळात पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी कठोरात कठोर होण्यासाठी सुद्धा मराठी पत्रकार परिषद आक्रमक आहे. आज पाटोदा येथे एस एम देशमुख सरांच्या आदेशानुसार पाटोदा येथे पत्रकार संरक्षण कायद्याची होळी करत आहोत..
-प्रा.सचिन पवार
अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद पाटोदा.
★एस एम देशमुख सरांचा आदेश निघाला अन् पत्रकार रस्त्यावर उतरले!
पत्रकार संरक्षण कायद्यासाठी जेव्हा एस एम देशमुख सरांनी पत्रकारांना आवाज दिला होता तेव्हा देखील पत्रकार रस्त्यावर उतरून आक्रमक झाले होते आज पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी होत नसल्याने पुन्हा एस एम देशमुख सरांनी सर्व पत्रकारांना आधीच दिला आणि सर्व पत्रकार पुन्हा रस्त्यावर उतरले आणि पत्रकार संरक्षण कायद्याचे होळी करून निषेध नोंदवला.. आता येणाऱ्या काळात पत्रकारांच्या बाबत तर केलेला पत्रकार संरक्षण कायदा कठोरात कठोर करून अमलात हीच मागणी घेऊन महाराष्ट्रातील मराठी पत्रकार परिषदेच्या आणि सर्व संघटनेचे पत्रकार आक्रमक झाले आहे.