★श्रीगणेश आँईलपेंट, प्लम्बिंग दुकानाचा शुभारंभ
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील बीड- नगर रोडवरील पांढरवाडी फाटा हा आजुबाजुच्या आठ गावांना नजीक असुन अनेक व्यवसायासाठी व्यापार्यांना पांढरवाडी फाटा हा व्यवसायासाठी संधी ठरत असल्याचे प्रतिपादन गोविंद गडाचे मठाधिपती ह.भ.प.अशोकशास्री महाराज यांनी केले.
सरपंच राजेंद्र ईथापे यांनी नवीनच सुरु केलेल्या श्रीगणेश आँईलपेंट आणि प्लम्बिंग मटेरियल दुकानाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. व्यासपिठावर भाजपाचे युवा नेते जयदत्तभैय्या धस ,माजी जिल्हा अध्यक्ष रमेशभाऊ पोकळे,माऊली जरांगे, रामदास बडे, भाऊसाहेब आण्णा भवर,मा.उपसभापती सत्यसेन मिसाळ ,मा.उपसभापती दादासाहेब धनवडे,अंमळनेर पोलीस ठाण्याचे स.पो.निरिक्षक चंद्रकांत गोसावी, सरपंच अशोक जेधे आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.प्रारंभी ह.भ.प.अशोकशास्री महाराज यांच्या सह मान्यवरांच्या उपस्थितीत दुकानाचा फित कापुन शुभारंभ करण्यात आला.उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांचे स्वागत सरपंच राजेंद्र ईथापे यांनी शाल ,श्रीफळ,पुष्पगुच्छ देऊन केले.
याप्रसंगी सरपंच जयदत्त धस म्हणाले की, सरपंच राजेंद्र ईथापे हे राजकरणाबरोबरच व्यवसाय देखिल करेक्ट करीत असुन गेल्या पंधरावर्षापासुन त्यांचा राजकारणात राबता आहे, पाच वर्षे उपसरपंच तर दहा वर्षापासून बिनविरोध सरपंच म्हणून विश्वासाने काम करीत आहेत. जनतेचा त्यांच्यावर विश्वास आहे. ईलेक्ट्रीक व्यवसायात ते अनेक वर्षापासून काम करीत असुन आता नविन व्यवसायात देखिल ग्राहकांचा विश्वास संपादन करतील असा विश्वास व्यक्त करीत जयदत्तभैय्या धस यांनी सरपंच राजेंद्र ईथापे यांच्या नवीन व्यवसायाला शुभेच्छा दिल्या.रमेश पोकळे,माऊली जरांगे, अशोक जेधे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त करीत राजेंद्र ईथापे यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी चेअरमन देविदास खोटे,गोवर्धन सुळे,ज्ञानेश्वर पाचपुते, साईनाथ कुमखाले,पो.काँ.पंकज आघाव,संजय घोशीर ,भारत पाचपुते, सरपंच संजय खोटे,दादासाहेब बेदरे,नगरचे व्यापारी श्रीमंतशेठ,स्वप्नील रणसिंग,प्रेमशेठ नवलानी,दादासाहेब पवार, नामदेव जाधव,गोरख शिंदे,आर्जून कुत्तरवाडे, भारत तोंडे,पप्पू पवार, प्रमोद करांडे,पत्रकार चंद्रकांत पवार, भाऊसाहेब पवार, बाळासाहेब कुमखाले, अक्षय भवर,बबनराव उकांडे,नामदेव आरेकर,रुपेश जरे,शरद कुमखाले, जयराम मळेकर, भाऊसाहेब ससे,विष्णू सकुंडे,पोपट गर्जे, शिवाजी गर्जे,चेअरमन कल्याण पवार,लक्ष्मण ईथापे,भारत पाचपुते, यांच्यासह परिसरातील शेतकरी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, चेअरमन मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी फराळाने कार्यक्रमाची सांगता झाली. सुत्रसंचालन भाऊसाहेब ससे यांनी तर आभार सरपंच राजेंद्र ईथापे आणि चेअरमन कल्याण पवार यांनी केले.
★आ.सुरेश धस यांचेकडून व्यायाम शाळेचे साहित्य
पांढरवाडी फाटा व परिसरातील तरुण जिद्दीने आभ्यास करणारा असुन अनेक तरुण सैन्यदलात आणि पोलीस भरतीत यशस्वी झाली आहेत. अनेकजन भरतीसाठी प्रयत्न करीत आहेत त्यांना शारीरिक परिपक्वता येण्यासाठी आ. सुरेश धस यांनी व्यायामाचे साहित्य ऊपलब्ध करुन दिले असुन लवकरच येथे पोहच होईल अशी माहिती याप्रसंगी माऊली जरांगे यांनी दिली. तर राजेंद्र ईथापे आणि अशोक जेधे हे दोघे सरपंच कर्तबगार असुन अहोरात्र जनतेच्या सेवेत असतात असे गौरोद्गार व्यक्त केले.