★शेतकरी राजा मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत !
बीड | प्रतिनिधी
पावसाळा सुरू होऊन दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत तरीदेखील सिरसाळा परिसरातील तसेच म्हणावा असा पाऊस न पडल्याने शेतकऱ्यांसमोर चिंतेचा विषय ठरत आहे.पाऊस न झाल्यास खरीब हंगामात जी पिके घेतली जातात त्याचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होईल अशी भीती शेतकऱ्यांना वाटू लागले आहे पावसाने आता अचानक विश्रांती घेतली ने कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत.
शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील पेरण्या पूर्ण केल्या आहेत. तर हीच पिके आता पाण्यावाचून सुकू लागली आहेत,या पिकांना आता पाण्याची गरज भासू लागली आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले असून शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे. पावसाळ्याचे सुरुवातीचे अडीच महिने निघून गेले.मागील वर्षाचा अनुभव पाहता शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. याकरिता महागडे बी बियाने, खते, औषधे यावर मोठा खर्च केला आहे. परंतु, पाऊस लांबू लागला असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. पेरणी केलेली कापूस, सोयाबीन,मका,तूर, उडीद,आदी पाऊस पडला तरच पिकांना जीवदान मिळणार आहे. अन्यथा शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार आहे.दरवर्षी पावसाळ्यात ऑगस्टमध्ये पावसाच्या पाण्याने ओढे, नाले भरुन वाहत असतात. मात्र, यंदा पाऊस लांबला आहे. जूनच्या सुरुवातीपासूनच पावसाने शेतकऱ्यांची निराशा केली आहे. त्यामुळे ओढे, नाले कोरडे पडलेले आहेत. तर विहिरींनीदेखील तळ गाठलेला आहे. तर माळरानावरील विहीरी अद्यापही कोरड्या ठाक पहलेल्या आहेत. त्यामुळे पेरणी केलेल्या पिकांना कोठून पाणी द्यायचे हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर पडला आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी ऊसाची मोठ्या प्रमाणात लागवड केलेली आहे. याला देखील पाण्याची कमतरता भासू लागली आहे.पाऊस आलाच तर हलका ते मध्यम स्वरुपाचा येतो. या पावसामूळे जमिनीत ओल तयार होत नाही. या उलट रिमझिम पावसामुळे शेतात गवत, तन जास्त वाढत चालले आहे. यामुळे शेतकऱ्यांना सातत्याने जमिनीची मशागत करावी लागत आहे.
★शेतकरी चिंताग्रस्त!
पावसाने जूनमध्ये दगा दिला जुलैमध्ये शेतकऱ्यांनी रिमझिम पावसावर पेरणी केली मोठ्या पाऊस झाला नाही ऑगस्टच्या दहा दिवस उलटून गेले तरी पाऊस झाला नाही. शेतकऱ्यांनी मोठ्या धाडसाने खरिपाच्या पेरण्या केल्या आहेत. याकरिता महागडे बी बियाने, खते, औषधे यावर मोठा खर्च केला आहे. परंतु,पाऊस पडत असल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत शेतकऱ्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे..
★मोठ्या पावसाची प्रतीक्षा!
जून मध्ये पेरणी झोका पाऊस झाल्याने सर्वत्र पेरणे देखील झाले आहेत. परंतु म्हणावं तेवढा मोठा पाऊस नसल्याने पिकांना जीवनदान मिळेल असा मोठा पाऊस अपेक्षित आहे परंतु गेले दहा दिवसापासून पावसाने साधी हुलकावणी देखील दिली नसल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. हजार रुपये खर्च करून मशागत केली बियांवर हजारोंचा खर्च केला आता वरुणराजा जर बर असला नाही तर शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिल्याशिवाय राहणार नाही.