[ वांजरा फाटा – कुसळंब रस्त्याची दुरावस्था तीनच महिन्यात कोट्यावधी खड्ड्यात ]
★ सर्वसामान्य नागरिक नेतेमंडळी पत्रकार संबंधित गुतेदाराला सांगून थकले !
★आता जिल्हा अधिकारी साहेबाकडे जाण्याची वेळ आली!
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ म्हणून कुसळंबची ओळख आहे, परंतु जाण्या येण्यासाठी रस्त्याची कमतरता असल्याने कोट्यावधी रुपये मंजूर करून रस्त्याला मंजुरी मिळाली आणि रस्ता सुरू झाला, तयार देखील झाला. पण अवघ्या तीनच महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था पूर्वीसारखीच झाली. सध्या त्या रस्त्याला ठिगळ जोडणी सुरू आहे. जनता म्हणतीये या ठिगळाच्या रस्त्याला नजर ना लागू कुणाची.. वांजरा फाटा – कुसळंब रस्त्याची अशी कशी दुरावस्था करून ठेवली आहे.
वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या निधी मंजूर झाला. रस्ता सुरू होताना गुत्तेदाराकडून असं दाखवण्यात आलं की, हा रस्ता एकदम हाय फाय क्वालिटीचा होणार आणि त्यावर एकही खड्डा पडणार नाही. अशा पद्धतीने त्यांच्या तोंडून गोडवाक्य ऐकायला मिळत होते परंतु अवघ्या तीनच महिन्यात आणि भूर भूर होणाऱ्या पावसातच वांजरा फाटा – कुसळंब रस्त्यावर खड्डेच खड्डे झाले. पहिल्यापेक्षा मोठा रस्ता असल्याने साईट पट्टे वाढवण्यात आल्या परंतु वाहनांची वर्दळ सुरू झाली आणि मग काय सगळ्या साईट पट्ट्या पूर्णपणे खचून गेल्या आता कुसळंब – वांजरा फाटा रस्त्यावर खड्डेच खड्डे पहायला मिळत आहेत.. येणारे जाणारे नागरिक म्हणत आहेत ठिगळाचा रस्ता पहायचा असेल तर कुसळंब – वांजरा फाटा रस्त्यावर जाऊन या.. इतका खराब रस्ता करून ठेवला आहे. एकूणच कोट्यावधीचा निधी चक्क खड्ड्यात घातला आहे. तरी देखील प्रशासनाचे कोणतेच अधिकारी यावर गंभीर दखल घ्यायला तयार नाहीत. पत्रकार आणि सामान्य नागरिक यावर आवाज उठवत आहेत परंतु प्रशासन हाताची घडी आणि तोंडावर बोट ठेवून शांत बसल आहे. सगळं कसं सगळ्यांचं मिळून मिसळून चाललं आहे..
★कुसळंब – वांजरा फाटा या ठिगळाच्या रस्त्याला नजर ना लागो!
अवघ्या तीनच महिन्यात आणि भूर भूर येणाऱ्या पावसात कोट्यावधीचा रस्ता पूर्णपणे खड्ड्यात गेला आहे. प्रशासन पहायला तयार नाही. गुत्तेदार चांगला रस्ता करायला तयार नाहीत. ग्रामस्थ नागरिक पत्रकार या विषयावर वारंवार आवाज उठवत आहेत, परंतु प्रशासनातील सर्वच अधिकारी गप्प बसले आहेत, जणू काय हाताची घडी तोंडावर बोट… अशीच अवस्था प्रशासनाची झाली आहे, मग काय गुत्तेदार थातूरमातूर काम करून निघून जातात पुन्हा म्हणतात पाच वर्षे मी आहेच ना… काय ही अवस्था करून ठेवली या रस्त्याची… सगळं कसं ओके मध्ये चालू आहे..
★वांजरा फाटा – कुसळंब रस्त्याकडे प्रशासन गांभीर्याने कधी पाहणार ?
वांजरा फाटा – कुसळंब हा रस्ता अतिशय बोगस पद्धतीने केला आहे. चक्क तीनच महिन्यामध्ये रस्त्याची अवस्था खड्ड्यात गेली आहे. कोट्यवधी रुपये खर्चून बनवलेला रस्ता तीन महिन्यात भुरभुर पावसात खड्ड्यात जात असेल तर काय म्हणावं लागेल असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. प्रशासनामध्ये अधिकारी याकडे गांभीर्याने पाहिला तयार नाहीत. गुत्तेदार खड्डे बुजून निघायला तयार आहे. जनतेचे बेहाल कोणीच पाहिला तयार नाही…
★जिल्हाधिकारी साहेब तुम्ही तरी थोडं लक्ष घाला!
या गुत्तेदाराला पाच वर्षे परत पाठवू नका पण आता रस्ता चांगला करून द्या अशी नागरिकांचे प्रतिक्रिया येत आहे.. गुत्तेदार म्हणतायेत पाच वर्ष माझ्याकडेच काम आहे. जनता म्हणते तुम्ही आत्ताच चांगलं काम करा.. पाच वर्षे येऊच नका.. सर्वसामान्य नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना हाक दिली आहे.. जिल्हाधिकारी याकडे पाहणार का ? रस्ता पुन्हा चांगला होणार का ? असे प्रश्न नागरिकांनी उपस्थित केले आहेत..