5.3 C
New York
Monday, December 1, 2025

Buy now

spot_img
spot_img

रोडरोमिओची दहशत!

★पोलिसाचा राहिला नाही धाक !

बीड | प्रतिनिधी

महाविद्यालय, शाळा असणाऱ्या आवारातील येथे रोडरोमिओच्या दहशतीमुळे विद्यार्थीनी अक्षरश त्रस्त आहेत. विद्यार्थीनींना संरक्षण देण्यासाठी असणारे पोलीस मात्र सुस्त असल्याचे दिसून येत आहे.
सिरसाळा येथील युवती व युवकांत छेडछाडीवरून आणि वादाच्या घटना घडल्या आहेत आज अशा घटनांनी उचल खाल्ली आहे. कॉलेज व शाळेत शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींना रोडरोमिओंचा त्रास सहन करावा लागत असून एकट्या मुलीला शाळेत व कॉलेजला जाणे मुश्कील होत आहे.
रोडरोमिओ मोटारसायकलवरून सुसाट मुलींना कट मारून जातात. काही मुले तर गाड्या घेऊन विनाकारण कॉलेज परिसरात घिरट्या घालत असतात. या रोडरोमिओंवर कसल्याही नियंत्रण नसल्याने रोडरोमिओंची दहशत निर्माण झाली आहे. न्यु हायस्कूल शाळा व पंडीत गुरु पार्डीकर महाविद्यालय कॉलेजला पायी ये-जा करीत असताना या वेळी त्याचप्रमाणे मोटारसायकलला कर्कश आवाजाचा हॉर्न बसविलेला असतो, रोडरोमिओने हॉर्न वाजवतच मुलीकडून मुर्खा असे बोलले जाते. बाजारपेठ रस्त्यावरून वेगाने पळवित असतात.रोडरोमिओंना गावातील पालकांची अडविण्याची हिंमत होत नाही. रोडरोमिओ दहा मिनिटांत भ्रमणध्वनीवरून ३० ते २० मुले गोळा करून दहशत पसरवत आहेत. काही रोडरोमिओंनी मोटारसायकलच्या सायलन्सरमध्ये बदल करून फटाक्यासारख्या आावजाचा सायलन्सर बसवून कॉलेज व शाळा परिसरामध्ये रोडरोमिओंचा दहशत निर्माण करीत आहेत.या प्रकाराबाबत आवाज उठविताना कोणीच दिसत नाही. याला आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासनाने कडक मार्ग अवलंबण्याची गरज आहे गावातील रोडरोमिओंचा शोध घेऊन पोलीस ठाण्याने शाळा कॉलेज परिसरातील मोटार सायकलवर फिरणारेया रोडरोमिओंचा शोध घेऊन कडक कारवाई करावी तसेच मोटारसायकली जप्त कराव्यात, अशी मागणी पालकवर्ग करीत..

★दरोगाजी तुमची इथे धमक दाखवा
न्यु हायस्कूल व पंडीत गुरूपार्डीकर, कॉलेज या परिसरात दहावी,बारावी, शाळा आदी खासगी ट्युशनचे वर्ग चालवले जातात. याचाच फायदा घेत काही टवाळखोर रोडरोमिओ या मुलींचा आपल्या दुचाकीद्वारे पाठलाग करून छेड काढतात. भीतीपोटी कोणीही तक्रार द्यायला पुढे येत नाही परंतु रक्षणाची जबाबदारी महणून पोलिसांकडे पाहिले जाते पण दरोगाजी गरिबावर धमक दाखवतात तेवढी धमक जर अवैध धंदे करणारे व रोडरोमिओं वर दाखविणार का असा सवाल नागरिकांतून उपस्थित होत आहे.

★शाळा बंद करण्याचा वेळ
शाळ कॉलेज सुरू होण्याच्या व सुटण्याच्या वेळेत नवनवीन दुचाक्या युवकांकडून सुसाट हाकल्या जातात अशा टवाळखोरला कटाळून असे आणि मुलीवर शाळा बंद करण्याचा वेळ आली आहे टवाळखोर युवकांवर कोणतीच कारवाई होत नाही रोडरोमिओंचे दहशतवर आवाज उठविताना कोणीच दिसत नाही.
-अशोक शेप
युवा नेते वंचित बहुजन आघाडी सिरसाळा‌

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!