★भाजपाच्या दडपशाहीला मतदानातुन जनताच उत्तर देईल – गणेश बजगुडे पाटील
बीड / प्रतिनिधी
बीड जिल्ह्याच्या नेत्या राज्यसभेच्या खासदार रजनीताई अशोकराव पाटील यांची राज्यसभेत केलेले निलंबन काल रद्द करण्यात आले आहे. रजनीताई पाटील ह्या जनतेच्या विकासाचे प्रश्न घेवुन राज्यसभेत आक्रमकपणे सरकारला धारेवर धरत जाब विचारात. अतिशय प्रभावी व आक्रमकपणे जनतेच्या हितासाठी केलेले अक्रमक भाषण भाजपा सरकारला जिव्हारी लागले आणि त्यांच्यावर शब्दावलीचे चित्रीकरण केल्याचा बिनबुडाचा आरोप करत चुकीच्या पद्धतीने निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. तब्बल साडे पाच महिने त्यांना सभाग्रहापासून दूर ठेवण्याचे काम भाजप सरकारने केलेले असताना काल न्यायालयाने राहुलजी गांधी यांचे निलंबन रद्द करत त्यांना कायम केले असता त्याच्या दुसऱ्याच दिवशी आता रजनीताई पाटील यांच्यावरील देखील चुकीच्या पद्धतीने केलेली कारवाई रद्द करून त्यांची खासदारकी कायम केली असल्याने बीड तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तालुकाध्यक्ष गणेश दादा बजगुडे पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी फटाके फोडून पेढे वाटत आनंदोत्सव साजरा केला यावेळी तालुका उपाध्यक्ष शेख कादर बाबामिया, तालुका सचिव शेख अरशाद, शेख अरबाज, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमान घोडके, शहराध्यक्ष लखन घुमरे, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष शेख शैफिक, शेख जहीर, आलम खान शेरखान, अक्षय पेठे, बंडु चौरे, भगवान देवकाते, राम गायकवाड, जलील खान, मिलिंद मस्के, सय्यद नासीर आदी पदाधिकारी उपस्थित होते.