★राहुल गांधींच्या शिक्षेला स्थगिती स्वागतार्ह – राहुल जाधव
पाटोदा | प्रतिनिधी
गुजरात सुरत येथील न्यायालयाने राहुल गांधी यांना सुनावलेल्या दोन वर्षाच्या शिक्षेला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे स्वागत करून पाटोदा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने दि.६ सोमवार रोजी रोटी बँके पाटोदा येथे गोरगरीब जनतेस अन्नदान करण्यात आले.
सर्वोच्च न्यायालयाने दिलेला हा निर्णय म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस कार्यकर्त्यासाठी मोठी आनंदाची बाब आहे. राहुल गांधींना दि.२३ मार्च रोजी दोन वर्षाची शिक्षा सुनावली होती त्यानंतर त्यांचे खासदारकी निलंबित करण्यात आले होते.राहुल गांधी यांनी त्यानंतर गुजरात उच्च न्यायालयात धाव घेतली होती.तेथेही त्यांना दिलासा मिळाला नव्हता.त्यानंतर राहूल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली या सर्वोच्च न्यायालयाने त्यांना दिलासा दिला या निकालामुळे न्याय व्यवस्थेवरील सर्वसामान्यांचा विश्वास आणखी वाढला आहे.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. असे तालुकाध्यक्ष राहुल जाधव म्हणाले. पाटोदा तालुका राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने पाटोदा शहरातील रोटी बँक या ठिकाणी गोरगरीब जनतेस अन्नदानमध्ये चपाती, भात, भाजी, स्वीटमध्ये चिलेबी,पेढा देऊन आनंदोत्सव साजरा केला.यावेळी भाई विष्णुपंत घोलप, तालुकाध्यक्ष राहुल जाधव, नगरसेवक उमर चाऊस, शहराध्यक्ष शेख इम्राननुर,सय्यद रियाज,शंकर घाडगे,पवन अडागडे, संकेत अडागडे,पठाण सोहेब, सय्यद जैद, ईश्र्वर जाधव, माणुसकीच्या भिंतचे दत्ता देशमाने, रामदास भाकरे, संतोष गर्जे आदीं उपस्थित होते.