★मराठवाडा रहिवासी संघाच्या कार्याचे केले कौतुक !
बीड | प्रतिनिधी

मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते रुपेश राजे बेदरे पाटील यांच्या बीड येथे निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा कार्यकर्त्यांनी केलेल्या सत्काराने अक्षरशः गहिवरले. यावेळी मराठवाडा रहिवासी संघाच्या कार्याचे त्यांनी कौतुक केले.
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांचा परवा बीड जिल्हा दौरा होता. विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने ते जिल्ह्यात असतानाच मराठवाडा रहिवासी संघाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सक्रिय कार्यकर्ते आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे कट्टर समर्थक रुपेश राजे बेदरे पाटील यांच्या बीड येथील निवासस्थानी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी आवर्जून सदिच्छा भेट दिली. यावेळी मराठवाडा रहिवासी संघा च्या कार्यकर्त्यांनी भव्य जंगी स्वागत केले. प्रचंड मोठा पुष्पहार घालून व गगनभेदी घोषणांनी आसमंत एक झाला. या उत्स्फूर्त सत्काराने यावेळी माननीय सुरज चव्हाण अक्षरशः काही क्षण गहिवरले! दरम्यान, यावेळी या निवासस्थानी झालेल्या चर्चेदरम्यान रुपेश राजे बेदरे पाटील यांनी मराठवाडा रहिवासी संघाच्या गेल्या अनेक वर्षापासूनच्या युवक बेरोजगार यांना तसेच कोरोना कालावधीत केलेल्या कार्याची माहिती दिली. हे ऐकून सुरज चव्हाण यांनी त्यांचे कौतुक केले. भविष्यात रुपेश बेद्रे पाटील यांच्या कार्याची दखल घेत मोठ्या पदाची जबाबदारी देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. रुपेश राजे बेदरे पाटील हे निरगुडी या गावचे रहिवासी असून मराठवाड्यासह पुणे येथे त्यांचा दांडगा संपर्क आहे. विशेषतः आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे.


