★आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन्ही मुलांनी प्रत्येकी ३ हजार रु.महिना देण्याचा आदेश !
★उपविभागीय अधिकारी यांचा न्याय निर्णय दिल्याने चर्चेचा विषय बनला
पाटोदा | सचिन पवार
आई-वडिलांचा सांभाळ न करणाऱ्या दोन मुलांना प्रत्येकी तीन हजार रुपये महिना देण्याचा न्याय निर्णय उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे यांनी दिला आहे याविषयीची अधिक माहिती अशी की,आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील रहिवासी असलेल्या श्रीमती सुभद्रा महादेव गर्जे आणि श्री महादेव गर्जे यांना मोठा मुलगा बापूराव महादेव गर्जे आणि धाकटा मुलगा संदीप महादेव गर्जे हे दोन मुले असून नोकरी लागल्यापासून आजपर्यंत आई-वडिलांचा सांभाळ करीत नसून आई-वडिलांची परिस्थिती आजारामुळे अत्यंत नाजूक झालेली आहे त्यामुळे त्यांच्याकडून मदतीची याचना करून उपविभागीय अधिकारी पाटोदा यांचे समोर अर्ज दिला होता .गर्जे दाम्पत्याचा एक मुलगा बाबुराव महादेव गर्जे हे शिक्षक असून इतर सर्व बाबींचा विचार करता आई वडील यांच्या वयाचा विचार करता दोन्ही मुलांनी आई-वडिलांचा व ज्येष्ठ नागरिकांचा निर्वाह व कल्याण अधिनियम 2007 मधील तरतुदीनुसार निर्वाहासाठी आणि औषधोपचारासाठी एकूण रक्कम रुपये 6000 त्यापैकी बापूराव महादेव गर्जे यांच्याकडून 3000 आणि संदीप महादेव गर्जे रा.सेलू जि.वर्धा यांचे कडून देण्यात यावी असा निर्णय पाटोदा उपविभागीय अधिकारी श्री. प्रमोद कुदळे यांनी दि.22 जून 20 23 रोजी दिला आहे .तसेच अर्जदार आई-वडील यांच्याकडून कोणतीही तक्रार निर्माण होणार नाही याची दोन्ही मुलांनी दक्षता घ्यावी असेही आदेशात म्हटले आहे .अशा प्रकारचा हा निर्णय झाल्याने आष्टी तालुक्यात चर्चेचा विषय झाला आहे.
★आई-वडिलांना न्याय मिळाल्याने सगळ्यांवरच बसला वचक!
आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील श्रीमती सुभद्रा महादेव गर्जे आणि श्री महादेव गर्जे यांना त्यांची दोन्ही मुलं नोकरी लागल्यापासून सांभाळत नसल्याच्या अर्धा स्वरूपात तक्रारी उपविभागीय अधिकारी पाटोदा यांच्यासमोर आल्या आणि मग काय सर्वच बुद्धीने हुशार पण मनाने भिकारी झालेल्या मुलांना एचडीएम साहेबांनी चांगला दणका दिला आहे.. आणि यापुढे असे कोणतेच मुलं वागणार नाहीत अशा पद्धतीने न्याय निर्णय दिल्या आहेत या निर्णयाची सर्व जिल्हाभरात चर्चा झाली आहे…
★मुलं आई-वडिलांना का सांभाळत नसतील बरं…
जेव्हा आई-वडील आपल्या मुलांना लहानाचं मोठं करतात आणि आपल्या मथरपणाचा आधार त्यांच्यामध्ये पाहतात तेच मुलं जेव्हा मोठे होऊन अधिकारी होतात आणि आपल्या आई-वडिलांना विसरतात तेव्हा त्या आई-वडिलांना काय वाटत असेल बरं.. मग असा प्रश्न पडतो हेच मुलं आई-वडिलांना का सांभाळत नसतील बरं… या प्रश्नाचे उत्तर प्रत्येक मुलाने आणि प्रत्येक आई-वडिलांनाच शोधावं लागेल.. कारण की त्यांचे उत्तर त्यांच्या पाशीच असतात परंतु ते योग्य वेळी पहात नसल्याने वेळ येत असावी.. तात्पुरता असाच अंदाज लावता येऊ शकतो…
★न्याय निर्णय झाला पण ही वेळ येऊ नये यासाठी प्रयत्न करावेत..
आष्टी तालुक्यातील पाटसरा येथील गर्जे कुटुंबीयांना पाटोदा उपविभागीय अधिकारी श्री प्रमोद कुदळे यांनी 22 जून रोजी दिलेला न्याय निर्णय हा योग्य झाला परंतु ही वेळ कोणत्याच आई-वडिलांवर आणि त्या मुलांवर येऊ नये कारण आपण काय आहोत हे जिल्हाभरात कळेल असं वागू नये.. पण जे वागत असतील त्यांना चांगला चपराक बसेल यातही शंका नाही..