★विविध सामाजिक उपक्रमातून होणार कारगिल दिवस साजरा – मेजर शिवाजी पवार
★कारगिल दिनानिमित्त वृक्षरोपण, तिरंगा रॅली, सैनिक वीर नारी सन्मान, वीर माता-पित्यांचा सन्मान!
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा येथे त्रिदल सेवा आजी माजी सैनिक संघटना पाटोदा यांच्या वतीने 24 व्या कारगिल विजय दिनानिमित्त विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून जोरदार तयारी झाली आहे. 26 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहीद चौक ते पूर्ण पाडोदा शहरांमध्ये शंभर गाड्यांची तिरंगा रॅली वृक्षारोपण सैनिक वीर नारी सन्मान सोहळा व वीर मातापित्यांचा सन्मान यासह आदी विशेष उपक्रमाचे आयोजन केले असून साठी महाराष्ट्रातून आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत तसेच राजकीय सामाजिक धार्मिक शैक्षणिक पत्रकारिता सर्व क्षेत्रांना देखील या कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे अशी माहिती त्रिजल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने मेजर शिवाजी पवार यांनी सांगितले आहे..
24 व्या कारगिल दिनानिमित्त अविस्मरणीय देखा सोहळा पाटोदा येथे संपन्न होत आहे. यासाठी महाराष्ट्रातून आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यामध्ये सामाजिक उपक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे. या कारगिल दिनानिमित्त त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.. या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन देखील त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने करण्यात आले आहे..
★कारगिल दिनानिमित्त त्रिदल सैनिक संघटनेकडून सामाजिक उपक्रमाचे आयोजन
24 व्या कारगिल दिनानिमित्त त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये वृक्षारोपण 100 गाड्यांची तिरंगा रॅली सैनिक वीर नारी सन्मान सोहळा वीर माता पित्यांचा सन्मान सोहळा आयोजन करण्यात आले आहे..
★आ.आजबे, आ.धस, मा.आ.धोंडे यांची विशेष उपस्थिती
त्रिदल सेवा संघ आजी माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने कारगिल विजयादिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी आमदार बाळासाहेब आजबे, आमदार सुरेश धस, माजी आमदार भीमराव धोंडे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे अशी माहिती त्रिदल संघटनेकडून देण्यात आले आहे…
★मेजर शिवाजी पवार यांचे आमदार धस यांच्याकडून कौतुक व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या
कुसळंब येथे आमदार सुरेश आण्णा धस कार्यक्रमानिमित्त आले असता त्रिदल सैनिक संघटनेच्या वतीने आयोजित कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याचे विनंती केली यावेळी मेजर शिवाजी पवार यांच्या कार्याचं व संघटनेचे कौतुक करत पुढील कार्यासाठी आमदार सुरेश धस यांनी शुभेच्छा दिल्या व कार्यक्रमासाठी नक्की उपस्थित रहावे असे देखील आश्वासन दिले..