19.7 C
New York
Tuesday, September 2, 2025

Buy now

spot_img
spot_img

देशाचे भवितव्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात – मा.आ.भिमराव धोंडे

★शिक्षकच खरे देशाचे व समाजाचे भाग्यविधाते -ह.भ.प.महादेवानंदजी भारती महाराज

★श्री.अश्वलिंग विद्यालयाच्या नूतन इमारतीचे थाटामाटात उद्घाटन संपन्न

कुसळंब | प्रतिनिधी

शिक्षकांना समाजात मानाचे स्थान आहे.गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत,आपल्या संस्थेत शिक्षण घेतलेले हजारो विद्यार्थी राज्यात व देशात विविध क्षेत्रात कार्यरत आहेत.शिक्षणामुळे ग्रामीण भागातील दारिद्रय कमी होण्यास मदत होईल.देशाचे भवितव्य घडविण्याचे काम शिक्षकांच्या हातात आहे.असे प्रतिपादन मा.आ.भिमराव धोंडे यांनी केले.आई वडीलांनी आपल्याला काबाडकष्ट करून उच्चशिक्षित करुन नोकरीस लावले.त्यांना कधीही न विसरता त्यांची मनोभावे सेवा करा असे संगीतकार व गीतकार प्रशांत मोरे यांनी सांगितले.
शिक्षण महर्षी व मा.आ. भिमराव धोंडे स्थापित शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ,आनंद चॅरिटेबल संस्था, किसान शिक्षण संस्था आणि छत्रपती शाहू एज्युकेशन सोसायटी आष्टी या संस्थांमधील सर्व कर्मचाऱ्यांच्या शैक्षणिक सहविचार सभेचे आयोजन व पिंपळवंडी येथील श्री.अश्वलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या नूतन इमारतीचा उद्घाटन समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.याप्रसंगी अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मा.आ.भिमराव धोंडे हे होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे उद्घाटक तथा अश्वलिंग संस्थानचे महंत ह.भ.प.महादेवानंद भारती महाराज, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस व राज्यपाल नियुक्त विद्यापीठ सिनेट सदस्य डॉ.अजय दादा धोंडे,कवी व संगीतकार प्रशांत मोरे, अभयराजे धोंडे,मा.जि.प‌‌‌.सदस्य बापुराव धोंडे,संस्थेचे जेष्ठ संचालक विठ्ठलआण्णा बनसोडे, शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे,मा.जि.प‌‌‌.सदस्य गो.गो.मिसाळ, सभापती सुवर्णाताई लांबरुड,कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती पांडुरंग नागरगोजे,उपसभापती देविदास शेंडगे,चेअरमन शिवाजी पवार,निलेश मोरे,गोविंद गाडे, सामाजिक कार्यकर्ते छगनराव तरटे, नवनाथ सानप,बाळासाहेब पवार, सरपंच भागवत वारे,आण्णासाहेब भोसले,उपसरपंच दादासाहेब पवार,ज्ञानेश्वर पवार,नामदेव जाधव, किसन पवार,रिपाईचे तालुकाध्यक्ष नरेंद्र जावळे,दिलीप म्हस्के,उत्तम पवार,विलास पटवा,बंडू पवार,भाऊसाहेब जरे,बद्रीनाथ पवार, डॉ.रेवननाथ पवार,मुख्याध्यापक दिलीप पवार,सतिष पवार,अशोक गुजर,सौदागरसेठ,पोपट शेळके, बाबासाहेब नाकाडे,राजेंद्र पवार,टी. जी.पवार व इतरांची उपस्थिती होती. पुढे बोलताना मा.आ.भिमराव धोंडे म्हणाले की,विद्यार्थ्यांनी आता आय.टी.क्षेत्राकडे वळावे. शेतकऱ्यांच्या मुलांनी उच्चशिक्षित होऊन चांगल्या पदावर नोकरी करून आई-वडिलांचे व शाळेचे नावलौकिक करावे.याप्रसंगी अजयदादा धोंडे म्हणाले की,सर्व शिक्षक माझ्यासाठी जेष्ठ आहेत.विद्यादानाचे काम शिक्षकांनी प्रामाणिकपणे करावे.आपापल्या गावातील पालक व नागरिकांचे चांगले संबंध ठेऊन विद्यार्थी संख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावेत व गुणवत्तापूर्ण शिक्षण द्यावे.संगीतकार प्रशांत मोरे यांनी “तिच्यामध्ये दिसती मले तव्हा माझी माय,”तहान चित्रपटातील मोसंमांची बेइमानी व इतर कविता सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.आई-वडिल व लेकीवर आधारित कविता सादर केल्या.आई-वडीलांची मनोभावे सेवा करा.वडील रडण्याचे नाही तर लढण्याचे काम करतात.याप्रसंगी, उपसभापती पांडुरंग नागरगोजे म्हणाले की,मा.आ.भिमराव धोंडे यांनी संस्थेच्या माध्यमातून मतदारसंघात शैक्षणिक क्रांती घडविली आहे.शेतीची जाण असणारे शेतकऱ्यांचे नेते आहेत.आमदार असताना रस्त्याबरोबर अनेक विकासकामे केली.डॉ.रेवननाथ पवार म्हणाले की, भिमराव धोंडे यांनी खऱ्या अर्थाने महात्मा फुले यांचा आदर्श पुढे चालविला आहे.शिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे म्हणाले कि,मी आनंदराव धोंडे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आहे.कर्मवीर आण्णांचा वारसा भिमराव धोंडे पुढे चालवत आहेत.मा.जि.प‌‌‌.सदस्य गो‌.गो.मिसाळ म्हणाले की,मा.आ.भिमराव धोंडे यांच्यामुळे शैक्षणिक विकासासह व सर्वांगीण विकास झाला आहे. शेतकऱ्यांसाठी दिल्ली पर्यंत पायी मोर्चा काढला.अतिशय प्रामाणिक स्वभावाचे व्यक्तिमत्त्व आहेत.ह.भ.प. महादेवानंद भारती महाराज म्हणाले कि,शिक्षकच देशाचे व समाजाचे भाग्यविधाते आहेत. शिक्षकांबद्दल मला खुप आदर आहे. मा.आ.भिमराव धोंडे यांनी गावागावात शाळा सुरु करुन शैक्षणिक प्रगती केली.प्रारंभी इर्शालवाडी दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या तसेच संस्थेचे जेष्ठ संचालक कै.अंबादास अनारसे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.कार्यक्रमास संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ.डी.बी‌.राऊत,प्रा. शिवदास विधाते,दत्तात्रय गिलचे, माऊली बोडखे,संजय शेंडे,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे सिनेट सदस्य व प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,प्राचार्य डॉ.दत्तात्रय वाघ,पत्रकार उत्तम बोडखे,बबनराव उकांडे, भाऊसाहेब पवार,मनोज पोकळे,के.टी.पवार यांच्यासह विविध शाळांचे मुख्याध्यापक,प्राचार्य, उपप्राचार्य,शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परिसरातील पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक भोसले सर यांनी केले.उपस्थितांचे आभार शिक्षक जरे सर यांनी मानले.सूत्रसंचालन तोतरे सर,शाम पवार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेकरिता शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!