जीवनातील विविध प्रसंग घटना सांगणारे राजेंद्र महाराज लोखंडे
कुसळंब | प्रतिनिधी
पाटोदा येथील राजेंद्र महाराज लोखंडे या अवलियाला एक अदभुत किमया अवगत आहे.लोखंडे महाराज आपल्या अदभुत लॉजीकने पुढील व मागील अनेक वर्षमधील सणावारांच्या तारखा अगदी अचुकपणे सांगतात.एवढेच नाही तर समोरील माणसांच्या जन्मतारखा देखील वारासह सांगतात.पाटोदाजवळ असलेल्या दिघोळ येथील राजेंद्र गंगाराम लोखंडे हे काही वर्षांपूर्वी शिक्षण व कामाच्यानिमीत्ताने पाटोदा शहरात आले आणि येथेच स्थायिक झाले.शाळेत असल्यापासुनच राजेंद्र लोखंडे हे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत.
काहीसे गुढ वागत,त्यावेळी खेमानंद महाराज यांचे
शिष्यत्व त्यांनी पत्करले होते.पाटोद्यात आल्यानंतर त्यांनी एम.ए.पर्यंतचे आपले शिक्षण पूर्ण करून काही काळ ह.भ.प. रामकृष्ण रंधवे महाराज यांच्या संस्थेत नोकरी ही केली मात्र त्यांच्या अध्यात्माकडेच अधिक कल राहीला.महाराज ब्रम्हचारी आहेत.दरम्यान त्यांच्या या गुढ वागणुकीतुनच त्यांच्यातील अनोख्या तर्कशक्तीची जाण होऊ लागली.एकादा अनोळखी व्यक्ती जरी त्यांच्यासमोर गेला आणि त्यांना वाटले तर ते व्यक्तिची जन्मतारीख वारासह अगदी अचुकपणे सांगतात.
त्याचप्रमाणे त्यांच्या तारखेच्या तर्कशास्त्रानुसार त्या व्यक्तिच्या जीवनात भविष्यत घडू शकणाऱ्याही काही घटनांचा वेध सांगु शकतात.२०४० साली नोव्हेंबर महीन्यात ४ तारखेला दिवाळी आहे त्यादिवशी रविवार असेल,२०५५ साली २४ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री बुधवार रोजी असेल,१९४७ साली ६ मार्च रोजी होळीचा सण होता. तो दिवस बुधवारचा होता,१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले तो वार शुक्रवार होता अशा प्रकारे पुढील व मागील ५० वर्ष आणि त्याहीपेक्षा अधिक वर्षातील सणांच्या तारखा अगदी क्षणात कुणी बिनचुक सांगु शकेल यावर कोणाचा चटकन विश्वास बसणार नाही मात्र पाटोदा येथील राजु महाराज लोखंडे या अवलियाला मात्र ही अदभुत किमया अवगत असुन ते आपल्या अदभुत लॉजीकने पुढील व मागील अनेक वर्षंमधील सणावारांच्या तारखा अगदी अचुकपणे सांगतात, एवढेच नाही तर समोरील माणसांच्या जन्मतारखा देखील वारासह सांगतात.पाटोदा शहरापासुन जवळ असलेल्या दिघोळ येथील राजेंद्र गंगाराम लोखंडे हे काही वर्षांपूर्वी शिक्षण व कामाच्यानिमीत्ताने पाटोदा शहरात आले व येथेच स्थायिक झाले,शाळेत असल्यापासुनच राजु लोखंडे हे अध्यात्मिक वृत्तीचे आहेत.मनुष्याच्या जीवनात प्रत्येक शास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे.जन्म-मृत्यूचा फेरा हा कोणालाही चुकविता आलेला नाही परंतु याच जन्म-मृत्यूच्या संदर्भात जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला काहीही न पाहता अचूकपणे सांगितले तर आहे की नाही आश्चर्य.जामखेड तालुक्यातील दिघोळ या गावी अशाच एका अवलियाने जन्म घेतला आहे.आपल्या जीवनाशी संदर्भात असलेली घटना,जन्म,मृत्यू आणि घडणाऱ्या घटना हे अचूकपणे सांगण्याचे काम ४० वर्षीय लोखंडे महाराज करत आहेत.राजू गंगाराम लोखंडे हल्ली मुक्काम पाटोदा.पाटोदा तालुक्यातील महासांगवी गावाकडे जाणाऱ्या रोडवर ते राहतात.ब्रह्मचारी अवस्थेत असलेले लोखंडे महाराज यांचे शिक्षण दहावीपर्यंत दिघोळ येथे झाले आहे.महाविद्यालयीन शिक्षण पाटोदा येथे झाले आहे.बालवयातच लोखंडे महाराजांवर धार्मिक संस्कार झाले असल्यामुळे अध्यात्माची चांगल्या प्रकारे त्यांना आवड निर्माण झाली आहे.भगवान शंकराचे ते भक्त आहेत.त्यांना भविष्य जाणण्याची विद्या प्राप्त झाली आहे. माणसाचा जन्मदिनांक,वेळ,तारीख ते अचूकपणे सांगतात तर मृत्यूची तारीख आणि वेळ सुध्दा सांगतात.फक्त त्या व्यक्तीची ऐकण्याची मानसिकता असायला हवी.आपल्याकडे हस्तरेषा किंवा चेहरा पाहून भविष्य सांगणारी माणसं आहेत पण ज्योतिष शास्त्राचा कसलाही अभ्यास न करता लोखंडे महाराज माणसाच्या जीवनाबाबत ज्या गोष्टी सांगतात हे मात्र आश्चर्यपेक्षा कमी नाही..
★राजकीय नेते लोखंडे महाराजांना विचारून लढतात निवडणूक
राजेद्र महाराज लोखंडे यांचा सर्व विषयातील भविष्यवाणीचा विचार करून प्रस्थापित राजकीय पुढारी देखील त्यांना विचारल्याशिवाय निवडणूक लढवत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावर राजकीय मंडळींची गर्दी दिसून येते. विशेष म्हणजे काही राजकीय लोकांनी त्यांचा अनुभव देखील घेतला असून त्यांच्या बाबतीत महाराजांनी सांगितलेली भविष्यवाणी खरी ठरलेली आहे.