★रस्त्यांच्या कामाबरोबरच इतर विकास कामांनाही निधी कमी पडू दिला जाणार नाही – आ.आजबे
आष्टी | प्रतिनिधी
मतदारसंघातील विविध विकास कामे मार्गी लागावीत तसेच खुंटेफळ प्रकल्पाबाबतही आपण अजीत दादा पवार यांच्याशी बोललो आहोत, इतर कुठलीही अट समोर न ठेवता फक्त मतदारसंघातील विकास कामे व्हावीत कोणतीही अडवणूक होऊ नये यासाठीच आपण अजितदादा बरोबर सरकारमध्ये सामील झालो असून यापुढे विकास कामासाठी भरपूर निधी मिळणार आहे गावातील लोकांनीही विकास कामे सुरू असताना त्याकडे लक्ष देऊन ते दर्जेदार कसे होतील याकडे लक्ष द्यावे अधिकारी आणि गुत्तेदार यांनी या दोन्ही रस्त्याची कामे दर्जेदार करावीत रस्त्याच्या कामाबरोबर इतर कामांनाही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याचे यावेळी बोलताना आमदार बाळासाहेब आजबे यांनी सांगितले.
आष्टी तालुक्यातील देवळाली कडा टाकळी रुई व लोणी पिंपळा खुंटेफळ धानोरा या 09 कोटी 50 लक्ष रुपये किमतीच्या या दोन रस्ता कामाचा शुभारंभ आमदार बाळासाहेब आजबे यांच्या हस्ते शनिवार दिनांक 22 जुलै रोजी टाकळी व पिंपळा या दोन वेगवेगळ्या ठिकाणी जाहीर कार्यक्रमांद्वारे करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ज्येष्ठ नेते परमेश्वर काका शेळके युवा नेते सागर दरेकर धैर्यशील थोरवे जगन्नाथ ढोबळे पंढरीनाथ पारखे काकासाहेब शिंदे संदीप सुंबरे,महेश आजबे, उपअभियंता शिवाजी सानप अभियंता बादाडे साहेब सरपंच सावता ससाने हरिभाऊ दहातोंडे बाबासाहेब शेंडगे नवनाथ तांदळे सभापती पप्पू गुंड, भाऊसाहेब घुले अशोक पोकळे नगरसेवक नाजिम शेख सुभाष वाळके बाबासाहेब भीटे, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना आमदार आजबे म्हणाले की पावसाळी अधिवेशनात पुरवणी मागण्यांमध्ये मतदारसंघातील आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील विविध रस्ते कामांसाठी 25 कोटी रु.मंजूर झाले असून यातून होणारे रस्ते दर्जेदार करण्यात येतील,कडा या गावाकडून टाकळी कडे येणाऱ्या रस्त्याचे काम अगोदर सुरू करण्यात येणार आहे कारण रस्ता अत्यंत खराब झालेला आहे हा रस्ता पूर्वी ३.७० मीटर एवढा होता आता त्याचे रुंदीकरण करण्यात आले असून आता हा रस्ता ५.५०मीटर एवढा रुंद होणार असल्याने या परिसरातील गावातील शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना वाहतुकीसाठी सुविधा उपलब्ध होणार आहेत .हा रस्ता ठेकेदाराने दर्जेदार करावा,विकास कामांमध्ये लोकप्रतिनिधींची स्पर्धा असली पाहिजे कोणताही एका लोकप्रतिनिधीने विकास कामाचे श्रेय घेऊ नये..मी देखील खुंटेफळ साठवण तलावाचे श्रेय एकटा घेणार नाही..
या महत्त्वाकांशी प्रकल्पासाठी आ. सुरेश धस माजी आ. भीमराव धोंडे माजी आ. साहेबराव दरेकर यांना देखील या कामाचे श्रेय जाते. त्यामुळे होणारे आरोप आणि प्रत्यारोप थांबवले आहेत मी पूर्वीच्या पाटाने वाहत्या पाण्याऐवजी शिम्पोरा येथून थेट पाईप लाईन द्वारे खुंटेफळ साठवण तलावामध्ये पाणी जावे यासाठी प्रयत्न केले.. कारण थेट पाईपलाईन द्वारे १००% पाणी पोहोचणार असल्याने या योजनेसाठी प्रयत्न केले ..त्यावेळेस निघालेले शिंम्पोरा ते खुंटेफळ पाउपलाईनची काम स्थगीती नसती तर आत्ता पर्यंत ब-या पैकी काम मार्गी लागले असते.पण आता पुन्हा त्यामध्ये बी१ टेंडर निघून लवकरात लवकर काम मार्गी लावण्यासाठी आम्ही दोघे मिळवून प्रयत्न करून हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करत असल्याचेही आ.आजबे यांनी सांगीतले.
सध्या या तलावामध्ये 1.68 टी.एम.सी. पाणी येणार आहे.. मात्र, आपण सर्व लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करून आपल्या वाट्याचे आणखी ४ टीएमसी पाणी आणण्यासाठी प्रयत्न करावयाचे आहेत हे काम प्रगतीपथावर असून तालुक्यातील ज्या कामांना यापूर्वी स्थगिती दिलेली होती त्या सर्व कामांची स्थगिती उठवण्यात येईल..असे आश्वासन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेले आहे त्यामुळेच आपण आष्टी पाटोदा आणि शिरूर तालुक्यातील विकास कामांना वेग यावा यासाठी सत्तेच्या प्रवाहात सहभागी झालो आहोत..टाकळी ते वाकी व लोणी ते धानोरा हा रस्ता मोठा आणि चांगला होणार असल्यामुळे या रस्त्यावरील आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी हे रस्ता काम होण्यापूर्वीच पाईपलाईन चे काम करून घ्यावे जेणेकरून रस्ता झाल्यानंतर खोदकाम करून रस्त्याची नसदुस होणार नाही याची काळजी घ्यावी याबाबत परिसरातील सरपंचांनी शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले ,यावेळी बोलताना युवानेते धैर्यशिल थोरवे म्हणाले कि गेल्या वर्षीच हा रस्ता मंजूर झाला होता.पण सरकार बदलल्यामुळे हा रस्ता प्रलंबित राहिला आता हा रस्ता मार्गी लावला आहे.आता या रस्ताच्या बाजूने वृक्ष लागवड उपक्रम हाती घेऊ आपल्याला जो पाऊस कमी प्रमाणात पडत आहे.त्यामुळे वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घ्यावा असेही थोरवे यांनी सांगीतले.सागर दरेकर म्हणाले,गेल्या अनेक वर्षापासून रस्ताचा प्रश्न प्रलंबित होता.या रस्तासाठी आमदार बाळासाहेब आजबे यांनी लक्ष घातल्याने आता हा मार्गी लागणार आहे.या रस्तासह सुंबेवाडी,काकडवाडी याही रस्त्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणीही दरेकर यांनी केली यावेळी सरपंच सावता ससाणे ,राजेंद्र दहातोंडे,संजय धायगुडे यांची भाषणे झाली, पिंपळा येथील कार्यक्रमाचे सुंदर अशी नियोजन करण्यात आले होते या ठिकाणी मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ व कार्यकर्ते उपस्थित होते बाबासाहेब भिटे बाबा शेंडगे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्ताविक बाबासाहेब भिटे यांनी केले, सुञसंचालन अर्जुन काकडे यांनी तर उपस्थितांचे आभार गटप्रमुख सुभाष वाळके यांनी करून मानले. नागनाथ चौधरी कोंडी भाऊ झांबरे सुनील गाडे भीमराव बोडखे दादा पांडुळे संभाजी गाडे विजय शेळके विठ्ठल नागरगोजे राम तात्या कर्डिले नाना एकशिंगे भाऊसाहेब चौधरी अशोक शिंदे शिवाजी पाटील चौधरी मोहन बागडे लहू तरटे विष्णुपंत चौधरी डॉक्टर जाधव साहेब महादेव मामा जगताप भोर गुरुजी चांदभाई सय्यद बाबा भिटे बाबा शेंडगे बलभीम काळोखे अशोक कुताळ बन्सी काकडे आप्पा वाडेकर डॉक्टर लाळगे चंद्रगुप्त खलासे राजू सांबर महादेव अमृते चंद्रकांत गुंड संतोष गुंड बाबा कोहोक सतीश कोहोक शिवम मिरगळ पोपट शेकडे मुरलीधर शेकडे दिलीप तांदळे सिद्धेश्वर धांजे अंकुश तळेकर अनिल मोहिते राजेंद्र खांदवे अनिल काळे यांच्यासह टाकळी व पिंपळा परिसरातील मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.