★बिबट्याच्या मृत्यूने डोंगरपट्ट्या सह तालुक्यात खळबळ
बीड | प्रतिनिधी
वडवणी तालुक्यात चिखलबीड गाव व मानवी वस्ती जवळ बिबट्या मृत अवस्थेत सकाळी शेतकऱ्यांना आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीच वातावरण तयार झाला आहे . अचानकपणे बिबट्या मृत अवस्थेत आढळल्याने गावाकडे व परिसरामध्ये भीतीच वातावरण , तयार झाल्याचे चित्र डोंगर पट्ट्यातील, आसपासच्या सर्व गावांमध्ये निर्माण झालेल आहे.
चिखल बीड पासून एक ते दोन किलोमीटरच्या अंतरावर, ही घटना घडली असून, सकाळी शेतकऱ्याला हा बिबट्या आढळल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.बीड जिल्ह्यातील ही घटना जिल्हा वाशियांसाठी ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी खूप भीतीदायक आहे .अशी देखील चर्चा आता गावागावांमध्ये सुरू आहे. बिबट्या हा सकाळी शेतकऱ्यांना डोळ्याने पाह्यला असून आणखी वनविभागाच्या अधिकारी दुपारपर्यंत पंचनाम्यासाठी आलेले नाहीत. अशोक तांदळे यांच्या उसाच्या शेतात , मृत अवस्थेत बिबट्या आढळला, या वेळेस अमृता वस्तीतील बिबट्या पाहण्यासाठी गावातील लोकांनी, मोठ्या प्रमाणावर पाहण्यासाठी गर्दी केली होती. गावातील तरुणांनी व व्यक्तीने अशी माहिती दिली आहे की बिबट्या हा एकटा नसून त्याच्यासोबत आणखी एक बिबट्या असू शकतो, असं देखील गावातील व्यक्तींचे म्हणणं आहे. वन विभाग अधिकारी व पोलीस स्टेशनला फोन केला आहे, ते येऊन पुढील तपास करतील, व पंचनामा होईल असे गावातील व्यक्तीकडून समजते आहे.