★तेलगाव खुर्द येथील शेतकऱ्याची पोलिसात धाव!
बीड | प्रतिनिधी
तालुक्यातील तेलगाव खुर्द येथील रामकीसन श्रीरंग तांदळे यांची गाव पासून काही अनंतराव जमीन आहे त्या जमिनीत त्यांनी कापसाची लागवड केली होती मात्र गावातील शुभम तांदळे याने मुद्दाम त्यांच्या उभ्या कापसावर तण नाशक औषध मारून त्यांच्या कापसाचे नुकसान केले असल्याची तक्रार रामकीसन तांदळे यांनी माजलगाव ग्रामीण पोलिसात दि १९ जुलै २०२३ रोजी करून समधीतांवर कडक कार्यवाही करावी अशी मागणी केली आहे.
या विषयी माहिती अशी की रामकीसन श्रीरंग तांदळे वय ६७ वर्ष रा तेलगाव येथील असून त्यांची जमीन याच शिवारात गट नं. ११२ मध्ये १०० हे. ४० आर जमीन शिवार मौजा डावरगाव खुर्द येथे गट नं. २५ मध्ये ०२ हे. ९४ आर, गट नं.४२ मध्ये ०१ है. ५९.५० आर जमीन माझे आणि माझी पत्नी निलावती भ्र.रामकिसन तांदळे यांचे नाये ७/१२ अभिलेखात मालकी रकान्यात नोंदलेली आहे. सदर जमीनीचे आम्ही कायदेशीर मालक व ताबेदार आहोत. सदर जमीनीशी शुभम शंकर तांदळे यांचा कोणताही हक्कसंबंध नसतांना तो गुंडगिरीच्या बळावर सतत आमचे जमीनीस हरकत व अडथळा करत आहेत त्यामुळे आम्ही मा.दिवाणी न्यायाधिश क.स्तर माजलगाव यांचे न्यायालयात निरंतर मनाई हुकुम मिळणे बाबत रे. दि.दा.नं.१९८/२०२२ हा दाखल केला. त्यामध्ये निशाणी क्र. ५ तुर्तातुर्त मनाई हुकुमाचा अर्ज दिला. सदर अर्ज मा.न्यायालयाने दि.०१/०४/२०२३ रोजी गुणवत्तेवर मंजुर करून वरील शुभम शंकर तांदळे याने शेतात येवू नये म्हणून निरंतर ताकीद दिलेली आहे. त्या नंतर जुन २०२३ मध्ये गट न.११२ मध्ये ०१ एकर, गट नं.२५ मध्ये ०३ एकर, गट नं. ११४ मध्ये ६० आर अशा प्रकारे जमीनीमध्ये कापसाची लागवड केलेली होती. सदर जमीनीमध्ये कापसाचे पिक असतांना तसेच मा. दिवाणी न्यायालयाचे मनाई आदेश असतांना शुभम शंकर तांदळे याने दि.१५/०७/२०२३ रोजी संध्याकाळी १०.०० वा. सुमारास कापसाचे पिकावर विषारी औषध फवारणी केल्यामुळे माझ्या मालकी व ताब्यातील जमीनीमध्ये उभे असलेले कापसाचे पिक जाळून टाकून माझे अतोनात असे आर्थिक नुकसान केलेले आहे. त्यानंतर मी दि.१७/०७/२०२३ रोजी दुपारी ४.०० वा. शेतात गेलो व पाहणी केली केल्यानंतर शुभम शंकर तांदळे यास विचारणा केली असता तो मला म्हणाला की, तुम्ही तुमची जमीन मला देत नसल्यामुळे मीच तुमच्या शेतातील कापसाचे पिकावर विषारी औषध मारुन कापसाचे पिक जाळून टाकले आहे व माझेविरुध्द कोर्टाचा आदेश असला तरी मी कशाला भित नाही असे म्हणाला. तरी मा.साहेबांनी शुभम शंकर तांदळे रा. तेलगाव खुर्द ता. माजलगाव जि.बीड यांचेविरुध्द कायदेशीर कार्यवाही करावी. अशी तक्रार माजलगाव ग्रामीण पोलीस स्टेशन कडे व उपविभागीय अधिकारी माजलगाव यांचे कडेही रामकिसन श्रीरंग तांदळे यांनी केली आहे.