★पो.नि. बल्लाळ यांची आव्हानात्मक तपासासातील कामगिरी
बीड | प्रतिनिधी
माजलगाव शहरातून अचानक बेपत्ता झालेल्या २ तरुण विवाहित महिलांचा ५ दिवसात पोलिसांनी शोध लावला. या महिलांना शोधन्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. परंतु पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी तपास कामी योग्य दिशा पकडत आपल्या पथका मार्फत या महिलांना शोधून काढण्याची कामगिरी यशस्वी करून दाखवली.
काही दिवसापूर्वी माजलगाव शहरातून दोन विवाहित महिला बेपत्ता झाल्याची घटना घडली होती. एकाच घरातिल रहिवासी असणाऱ्या व नात्याने जावाजावा असणाऱ्या या दोन तरुण विवाहित महिला घर सोडून निघून गेल्या होत्या. या घटनेची पोलिसात नोंद करण्यात आली होती. दरम्यान पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले की सदरील महिलांचे घरातील कोणासोबतही भांडण झाले नव्हते. गल्लीत ही कोणासोबत तंटा नव्हता. त्याचप्रमाणे गल्लीतून अथवा परिसरातून कोन्याही पुरुषाने या प्रकरणाशी संबंध दर्शवील असे संशयितरित्या पलायन केले नव्हते. त्यामुळे या २ महिन्यात २० बेपत्ता व्यक्तींपैकी १७ व्यक्तींना पोलिसांनी शोधले.
माजलगाव शहरातून गेल्या दोन महिन्यात विविध कारनास्तव महिला, मुली, मुलांसह वीस व्यक्ती गायब झाल्याच्या पोलिसात तक्रारी आहेत. त्यापैकी पोलिसांनी तब्बल १७ लोकांना शोधून काढले आहे. दरम्यान इतर तीन बेपत्ता व्यक्तींचा ही पोलिसांकडून शोध सुरू आहे. अशी माहिती शहर पोलीसस्टेशनचे पो.नि.शितलकुमार बल्लाळ यांनी दिली. महिलांना शोधणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांनी या महिलांना शोधण्यासाठी एका पथकाची निर्मिती केली. नेमलेल्या पथकाने तपासाची योग्य दिशा पकडत अवघ्या ५ दिवसात संबंधित बेपत्ता २ महिलांना मुंबईतून शोधून काढले. दरम्यान सदरील महिला आपल्या कुटुंबासोबत सुखरूप पोहोचल्या आहेत. प्रकरणी पोलिसात कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल नाही. ही कामगिरी पोलीस निरीक्षक शितलकुमार बल्लाळ यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक गजानन सोनटक्के, पो. कॉ. महादेव कोकनार पो.कॉ. महेश चव्हाण यांनी पार पाडली.