निमगाव-आर्वी-पाडळी-रायमोहा-राज्य रस्ता क्रमांक 62 चे काम सुरू – डी.जी.मळेकर
शिरूर कासार | जिवन कदम
चकलांबा-निमगाव-आर्वी पाडळी- रायमोहा-गारमाथा तांबराजुरी-राज्य रस्ता क्रमांक 62 चे सुधारण्याचे काम सुरू करण्याची मागणी डी.जी. मळेकर सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री माननीय श्री अजित दादा पवार साहेब यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
निवेदनाच्या प्रती नामदार धनंजय मुंडे साहेब ,मंत्री कृषी विभाग व माननीय रवींद्र चव्हाण मंत्री सार्वजनिक बांधकाम विभाग यांना देण्यात आलेले आहेतया रस्त्याची एकूण लांबी 47.3 किलोमीटर असून याची बांधकामाची किंमत 265 कोटी रुपये आहे.या रस्त्याची डांबरी धावपट्टी सात मीटर रुंदीची होणार असून दोन्ही बाजूने दीड दीड मीटरच्या साईड पट्ट्या होणार आहेत. या रस्त्यावरील लहान पूल, मोठे फुल, नळकांडी पूल, चौक सुधारणा, थरमो प्लास्ट पेंट, सूचना फलक लावणे, इत्यादी कामे यामध्ये होनार आहेत.हा प्रकल्प ,अशियन डेव्हलपमेंट बँक सहायित,, असून एडीबी पॅकेज क्रमांक 31 द्वारे या प्रकल्पास एशियन डेव्हलपमेंट बँक ने मंजुरी दिलेली आहे..
या प्रकल्पास शासनाने अर्थसंकल्पात समाविष्ट करून निधीची तरतूद केल्यास हा प्रकल्पचे बांधकाम ताबडतोब सुरू होऊ शकते. त्यामुळे डीजी मळेकर सेवानिवृत्त मुख्य अभियंता यांनी माननीय वित्तमंत्री महाराष्ट्र राज्य यांना एका निवेदनाद्वारे विनंती केली असून अर्थसंकल्पात समाविष्ट करणे व निधीची तरतूद करणे असा आग्रह धरलेला आहे.
या रस्त्यामुळे दोन राष्ट्रीय महामार्ग व तीन राज्य मार्ग जोडले जाणारे आहेत. तसेच हा रस्ता पैठणला जाणारा सर्वात जवळचा रस्ता असून पैठण व निमगाव मच्छिंद्रगड ही धार्मिक स्थळे या रस्त्याने जोडली जात आहेत.या रस्त्यामुळे गजानन सहकारी साखर कारखाना तालुका बीड व जय भवानी सहकारी साखर कारखाना तालुका गेवराई या साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ऊस वाहतूकीस फायदा होणार आहे.बीड जिल्ह्यामध्ये पश्चिम भागात सर्व रस्ते पूरब पश्चिम असे आहेत हा या रस्त्याचे बांधकाम केल्यास हा रस्ता दक्षिण उत्तर होणार आहे व राष्ट्रीय महामार्ग व राज्य मार्ग यांचे एक जाळे तयार होणार आहे व कोणतेही गाव हायवे पासून एक किलोमीटरच्या आत मध्ये जोडलेले असेल. त्यामुळे या भागातील विकास कामास यामुळे गती येणार आहे.