★जिल्हा परिषदेचा कार्यकाल संपल्यानंतर आ. सुरेश धस यांचा अंमळनेर सर्कलमध्ये विकासाचा ओघ सुरू
कुसळंब | प्रतिनिधी
जिल्हा परिषदेचा कार्यकाळ संपूण दीड वर्षाचा कार्यकाल लोटला आहे परंतु आ. सुरेश आण्णा धस यांच्या माध्यमातून अंमळनेर जि.प. सर्कल मध्ये अनेक विकास कामाचा ओघ चालू असून अनेक विकास कामे मंजूर झालेले आहेत. व काही कामे प्रगतीपथावर असून आ. सुरेश धस अण्णांच्या विकासात्मक कार्याबद्दल मतदारसंघा प्रमाणे अंमळनेर सर्कल मधील सामान्य जनता खुश असून अंमळनेर सर्कल मधील विकासात्मक कामाबद्दल अंमळनेर जि.प. सर्कलचे भाजपाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब आण्णा भवर यांनी आ. सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.
आ. सुरेश आण्णा धस यांनी शैक्षणिक विभागाप्रमाणे स्थानिक विकास निधी अंमळनेर सर्कल साठी उपलब्ध करून देऊन अंमळनेर सर्कलचा कायापालट करून नंदनवन बनवण्याचे ध्येय असल्याचे भाऊसाहेब आण्णा भवर यांनी प्रतिनिधीला माहिती दिली. अंमळनेर ते निवडुंग रस्ता, अंमळनेर आठेगाव पुठ्ठा परिसरातील जनतेचा अस्मितेचा प्रश्न आहे. या रस्त्यासाठी आ. सुरेश धस यांनी निधी उपलब्ध करून देऊन हा रस्ता लवकरच पूर्ण होऊन जनतेची गैरसोय दूर होणार आहे. तसेच अंमळनेर सर्कल मध्ये २५-१५ तसेच डी पी टी सी व ९०-१० व ९५-०५ ची अनेक कामे सुरू आहेत. तसेच जलजीवन योजनेची कामे प्रगतीपदावर आहेत. धस यांनी मावशी समजल्या जाणाऱ्या अंमळनेर सर्कल मध्ये जास्तीचा निधी देत आई पेक्षाही जास्त प्रेम दिले. पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी- आंबेवाडी- चंद्रेवाडी रस्त्यासाठी २.५० कोटी रुपये मंजूर झाल्याने हा रस्ता दर्जेदार होणार आहे. अंमळनेर जि.प. सर्कल मधील सध्या जो विकास कामाचा धडाका चालू आहेत तो आ. सुरेश आण्णा धस यांच्या माध्यमातून व प्रयत्नातून होत आहे. या सर्व विकास कामाचे श्रेय फक्त सुरेश धस यांचेच होय, असे भवर म्हणाले. गेल्या दीड वर्षापासून जिल्हा परिषदेवर प्रशासन आहे. जिल्हा परिषदेवर प्रशासन असतानाही त्याची उणीव भासू न देता आ.धस अण्णांनी अंमळनेर सर्कलमध्ये अनेक विकासात्मक कामाचा सपाटा सुरू ठेवून जनतेच्या अडी- अडचणी सोडवण्यास कार्यरत असल्याने सामान्य जनता अण्णाच्या पाठीमागे खंबीरपणे उभी आहे यात तिळमात्र शंका नाही.