खड्ड्याची फुले वाहून, श्रीफळ फोडून पूजा ; अधिकाऱ्यांना थोडीफार वाटेल का ?
★कुचकामी प्रशासनाला जाग करण्यासाठी तीव्र आंदोलनाच मनसेचा इशारा!
शिरूर कासार | जीवन कदम
शहरातील मुख्य रस्ता जिजामाता चौक ते छत्रपती संभाजी चौक हा रस्ता खड्डेमय झालेला आहे पाऊस सुरू झाला की साचलेले पाणी नागरीकांना त्रासाचे ठरत असले तरी त्याकडे होणारे दुर्लक्ष त्याहुन अधिक क्लेशदायक ठरत असल्याने गुरूवारी मनसेच्या कार्यकर्त्यांनी धोंड्याच्या पवित्र महिण्यात खड्यात साचलेल्या घाण पाण्याची वाजत गाजत फुल वाहून पुजा करून श्रीफळ फोडले व याच पाण्यात बसुन जनतेच्या तिव्र भावनांचे नेतृत्व केले यावर कुचकामी प्रशासनाला जाग आलीच नाही तर मनसे अधिक तिव्र आंदोलन करेल असा इशारा देखील दिला.
शहराच्या मुख्य रस्त्यावर अगदी पोलीस स्टेशन जवळ तसेच शिवाजी नगर जवळ रस्त्यावर खड्डे पडलेले आहे ,या खड्यातील पाणी डासाला पोषक असुन डासांचा उद्रेक त्रासात भर टाकतो आहे शिवाय रहदारी त्रासाची होते ,याकडे निवेदनाद्वारे लक्ष वेधण्याचा प्रयत्न निष्फळ ठरल्याने मनसेचे तालुका अध्यक्ष सोपान मोरे यांनी वाजत गाजत खड्यांची व साचलेल्या पाण्याची पुजा करून याच घाण पाण्यात ठिय्या मांडला ,आंघोळ देखील केली.जागोजागी खड्डे ,मोकळ्या जागी वेड्या बाभळीचे जंगल याचा होणारा त्रास घडोघडी विजपुवरठा खंडीत होणे याशिवाय सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभारावर तिव्र संताप व्यक्त करत आता एव्हड्यावर सुधारणा झाली नाही तर आंदोलन तिव्र करणार असल्याचे सोपान मोरे यांनी सांगितले.पोलीसांना निवेदन देताना शिवाजी नगर भागातील महिला देखील उपस्थित होत्या.सोपान मोरे यांच्या आंदोलनाचा विषय अगदी रास्त असल्याच्या भावना शहरातील प्रत्येक नागरिकांकडून व्यक्त केल्या जात होत्या.
★संबंधीत अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष !
आंदोलना पुर्वि निवेदन देऊन देखील या आंदोलनाकडे संबंधीत अधिका-याने दुर्लक्ष केल्याची बाब अनेकांना खटकली .कायम स्वरूपी तोडगा काढला जाईल.मी आता नव्यानेच पदभार घेतलेला आहे ,प्रश्र्न समाजाने घेऊन त्यावर कायमचा तोडगा काढला जाईल असे भ्रमणध्वनीवर संपर्क केला असता नगरपंचायतचे मुख्याधिकारी प्रशांत जाधवर यांनी सांगितले.आंदोलकांच्या प्रश्नावर विचार केला जाईल तसेच नगरपंचायतच्या सर्वसाधारण सभेत हा विषय घेतला जाईल असे कार्यालयीन अधीक्षक एस. पी. जोशी यांनी सांगितले.
★ मुख्य रस्त्यांची दयनी अवस्था!
बीड पाथर्डी रोडला जोडलेला जिजामाता चौक ते पोलीस स्टेशन हा शिरूर चा प्रामुख्याने मुख्य रस्ता मानला जातो तर कोळवाडी फाटा ते बाजार तळ आणि बाजार तर परिसर या ठिकाणातील सर्वच मुख्य रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडलेले आहेत पहिल्याच पावसात या खड्ड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असून याचा फटका शहरातील नागरिकांना सातत्याने करावा लागत आहे.