8.8 C
New York
Thursday, April 10, 2025

Buy now

spot_img
spot_img

कारगिल विजय दिनानिमित्त पाटोद्यात भव्य तिरंगा रॅली, सैनिक वीर नारी सन्मान सोहळा

[ पाटोदा, बीडसह मराठवाड्याच्या आजी-माजी सैनिकांची जबाबदारी आता मेजर शिवाजी पवार यांच्या खांद्यावर ! ]

★त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटनेकडून पाटोद्यात भव्य शंभर गाड्यांची तिरंगा रॅली!

★आजी-माजी सैनिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता, सामाजिक क्षेत्रातील सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा – मेजर शिवाजी पवार

पाटोदा | प्रतिनिधी

24 व्या कारगिल विजय दिनानिमित्त पाटोदा येथे त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक पाटोदा तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार दिनांक 26 जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता शहीद चौक ते पूर्ण पाटोदा शहरांमध्ये शंभर गाड्यांची तिरंगा रॅली तसेच सैनिक वीर नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी महाराष्ट्रातून आजी-माजी सैनिक उपस्थित राहणार आहेत तसेच या कार्यक्रमासाठी नोकर वर्ग, राजकीय, धार्मिक, शेतकरी, युवा वर्ग, विद्यार्थी, पत्रकार तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुसळंब गावचे माजी आदर्श सरपंच तथा त्रिदल सैनिक संघटनेचे पाटोदा अध्यक्ष मेजर शिवाजी पवार यांनी केले आहे…
पाटोदा तालुक्यात प्रथमच 24 व्या कारगिल विजय दिनानिमित्त त्रिदल सेवा संघ आजी माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे, यामध्ये जिल्हाभरातील सर्व सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत, यात सैनिक वीर नारीचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर 100 गाड्यांची तिरंगा रॅली पूर्ण पाटोदा शहरांमधून निघणार आहे, या भव्य दिव्य कार्यक्रमासाठी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रातील सर्व बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कुसळंब गावचे माजी आदर्श सरपंच तथा त्रिदल सैनिक संघटनेचे पाटोदा अध्यक्ष मेजर शिवाजी पवार यांनी केले आहे…

★ 24 वा कारगिल विजय दिवस ठरणार लक्षवेधी!

यावर्षी पाटोदा तालुक्यामध्ये 24 वा कारगिल विजय दिवस भव्य दिव्य करण्याचे आयोजन त्रिदल सेवा संघ आजी-माजी सैनिक संघटना पाटोदा तालुक्याच्या वतीने आयोजित केले आहे. यामध्ये पूर्ण पाटोदा शहरांमधून 100 गाड्यांची तिरंगा रॅली तसेच सैनिक वीर नारी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे..

★ नवनिर्वाचित अध्यक्ष मेजर शिवाजी पवार यांची निवड आणि पहिलाच भव्य दिव्य कार्यक्रम

कुसळंब गावचे आदर्श माजी सरपंच मेजर शिवाजी पवार यांची त्रिदल सेवा संघ आजी माजी सैनिक संघटना मराठवाडा अध्यक्ष व पाटोदा तालुका अध्यक्षपदी निवड झाल्या नंतर प्रथमच 24 व्या कारगिल विजय दिवसानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यांच्या कार्याची सुरुवात भव्यदिव्य कार्यक्रमात होत असल्याने त्यांच्या कार्याला सर्वच क्षेत्रातून शुभेच्छा दिल्या जात आहेत..

★ मराठवाड्यातील आजी-माजी सैनिकांची जबाबदारी मेजर शिवाजी पवार यांच्या खांद्यावर!

पाटोदा, बीडसह मराठवाड्यातील आजी माजी सैनिकांच्या प्रश्नासाठी आवाज उठवणारी त्रिदल सेवा संघ आजी-माजी संघटना ही उदयाला आली असून आता पाटोदा बीड आणि मराठवाड्याची धुरा मेजर शिवाजी पवार यांच्या खांद्यावर आली आहे, पवार यांची निवड होताच त्यांनी कारगिल विजय दिनानिमित्त भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून आजी-माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत यामध्ये सैनिक वीर नारी सन्मान सोहळा आयोजित केला आहे…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!