“बँक आँफ बडोदा ” वर्धापन दिनानिमित्त डोमरी गुरुकुलाला प्रोजेक्टर सप्रेम भेट
कुसळंब | प्रतिनिधी
‘बँक ऑफ बडोदा ‘चा 116 वा वर्धापन दिन सोनदरा गुरुकुल, डोमरी येथे दि.20/07/2023 रोजी साजरा करण्यात आला.बँक ऑफ बडोदा,यांच्या 116व्या वर्धापन दिना निमित्त, बँक ऑफ बडोदा,मेन शाखा, सहयोग नगर बीड,यांनी सोनदरा गुरुकुल, डोमरी येथे विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षणास मदत म्हणून बँकेकडील सी. यस. आर. फंडा मधून एक प्रोजेक्टर भेट म्हणून दिला. आजच्या आधुनिक जगात संगणक ही काळाची गरज बनलेली असताना, प्रोजेक्टर मुलांना ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी उपयोगी येईल आणि जगातील अनेक आधुनिक गोष्टी पाहून विध्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पाडण्यास मदत होईल, असे मत बँकेचे वरिष्ठ प्रबंधक रेवणनाथ पवार यांनी व्यक्त केले. सदर कार्यक्रमास बँकेचे वरिष्ठ प्रबंधक रेवणनाथ पवार, प्रबंधक अनुराधा राख, प्रतिभा घोडके, अधिकारी सुरेंद्र भोंडवे, व इतर बँकेचे सर्व कर्मचारी उपस्थित होते. गुरुकुलातील विद्यार्थ्यांना प्रोजेक्टर दिल्याबद्दल गुरुकुलातील अश्विन भोंडवे, अशोक खोमणे व इतर शिक्षकवृंद यांनी बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.