★आनंद ॠषी डायग्णोस्टीक सेंटर रुग्ण मित्र फांऊडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत किडणी विकार, ब्लड प्रेशर, डायबेटिस तपासणी महाआरोग्य शिबीर
बीड | प्रतिनिधी
रुग्ण सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे ब्रीदवाक्य सोबती घेऊण समस्त सर्व सामान्य गोरं गरीब रुग्णांना मोफत व माफक दरात चांगली आरोग्य सेवा मिळावी याकरता आनंद ॠषीजी डायग्णोस्टिक सेंटर,आणी रुग्ण मित्र फांऊडेशन, बीड यांच्या तर्फे बीड जिल्ह्यात वेळोवेळी मोफत महाआरोग्य शिबीर आयोजित होत असतात. अशीच या पुढेही प्रत्येक गरजु रुग्णांना मोफत व माफक चांगली आरोग्य सेवा मिळावी हेच ध्येय धोरणे हाती घेऊन आनंदऋषी डायग्णोस्टिक सेंटर बीड व रुग्ण मित्र फांऊडेशन बीड यांच्या संयुक्त विद्यमाने बीड शहरामध्ये भव्य दिव्य मोफत किडणी विकार, ब्लड प्रेशर, डायबेटिस तपासणी व शुगर बीपी तपासणी मोफत होणार आहे. या शिबिरामध्ये तज्ञ डॉक्टर डॉ. गोवींद कासट MD .DM Nephrology तसेच डॉ जयप्रकाश शिरपुरवार MD. Med या तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांचे उपचार होणार आहेत. शिबीरामध्ये मधुमेह रुग्णांसाठी रक्त व लघवी तपासणी मध्ये गरजु रुग्णांना घवघवीत ५० % सवलत देण्यात येणार आहे. तसेच आवश्यक तपासणी मध्ये सुद्धा ५०% सवलत दिली जाणार आहे. या महाआरोग्य शिबीरामध्ये महात्मा ज्योतिबा फुले योजने अंतर्गत डायलेसीस मोफत केले जाणार आहेत. व कीडणीचे आजार अंगावर सुज येणे, लघवी कमी/ लाल होणे, किडणी जंतु संसर्ग, डायलेसीस किडणी ट्रान्सप्लांट, इत्यादी आजारांवर तज्ञ डॉक्टरांकडून रुग्णांचे उपचार केले जाणार आहेत. या मोफत महाआरोग्य शिबीराचे ठिकाण आनंदऋषिजी डायग्णोस्टीक सेंटर, जालना रोड बीड येथे दिनांक २३/०७/२०२३ रोजी सकाळी ठिक १० ते दुपारी ०१ पर्यंत राहणार आहे. तरी या मोफत महाआरोग्य शिबीराचा बीड जिल्ह्यातील तसेच शहरातील गरजु रुग्णांनी अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आनंद ॠषीजी डायग्णोस्टिक सेंटर बीड व रुग्ण मित्र फांऊडेशन बीड यांनी केले आहे. शिबीरामध्ये मोफत तपासणीचा लाभ घेण्याकरिता व नाव नोंदणी करता खालील नंबरवर संपर्क साधावा. 8262009091, 7499865797, 9850077371,9172439307 असे आवाहन करण्यात आले आहे..