14.7 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

बोंबला! 12 कर्मचाऱ्यांवर 40 हजार लोकसंख्येचा भार!

★प्राथमिक आरोग्य केंद्र असून अडचण नसून खोळंबा!

★सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील परिस्थिती; रिक्त पदे भरण्याची मागणी

आष्टी | सचिन पवार

जीर्ण झालेली इमारत, अपुरे कर्मचारी व उपचारांसाठी ताटकळत बसलेले रुग्ण अशी ओळख बनलेले तालुक्यातील सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरातील नागरिकांसाठी असून अडचण, नसून खोळंबा ठरत आहे. परिसरातील 40 हजार लोकसंख्येच्या आरोग्य सेवेचा भार केवळ 12 कर्मचा-यांच्या भरोशावर सुरू असून आरोग्य सेवा मिळणे दुरापास्त बनले आहे. रिक्त पदांची तातडीने भरती करून आरोग्य सेवेत सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.
आरोग्य विभाग एकीकडे लाखो रूपये खर्च करून मोठमोठ्या इमारती उभारून कामकाज करत असले तरी दुसरीकडे राहण्यायोग इमारत नसल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने देऊन देखील पर्यायी व्यवस्था नसल्याने आहे त्याच इमारतीती पाच वर्षापासून जिव धोक्यात घालून कामकाज करण्याची वेळ सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रातील अधिकारी, कर्मचाऱ्यांवर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून एखाद्या कर्मचाऱ्यांचा जीव गेल्यावर नवीन इमारत बांधली जाणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आष्टी तालुक्यातील सुलेमान देवळा प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत 43 गावे असून 8 आरोग्य उपकेंद्र आहेत, या परिसरातील 40 हजार लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी वैद्यकीय अधिकारी-दोन, औषध निर्माण अधिकारी-दोन, आरोग्य सहाय्यक (पुरूष)-दोन, आरोग्य सहाय्यक (स्त्री)-दोन, एएनएम-10, एमपीडब्ल्यू-6 वाहन चालक-1, कनिष्ठ सहाय्यक-1 व परिचर-6 अशी एकूण 30 पदे मंजुर आहेत. मात्र, 30 पैकी 18 पदे रिक्त असून केवळ 12 कर्मचा-यांवरच आरोग्य सेवेचा भार पडला आहे. या कर्मचा-यांमधूनही अनेक कर्मचारी गैरहजर अथवा सुट्टीवर असता. मुख्यालयी न राहता बाहेर गावाहून ये-जा करणा-या कर्मचा-यांची संख्या जास्त असल्याने आरोग्य सेवा मिळण्यासाठी आरोग्य केंद्रात आल्यानंतर ताटकळत असलेले रुग्ण व नातेवाईकांची सकाळच्या सुमारास नेहमीच गर्दी दिसते. वाट पाहूनही कर्मचारी न आल्यास तसेच आवश्यक त्या सुविधा उपलब्ध नसल्याने अनेकांना खासगी रुग्णालयांत जावून महागडे उपचार घ्यावे लागत आहेत.
रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यां-यांची वानवा असल्याने या आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया होत नाही, की महिलांची प्रसुतीही होत नाही. फक्त ओपीडी, मिटींग, लसीकरणाचे काम या आरोग्य केंद्रातून चालत असल्याने हे केंद्र नावालाच असल्याचे परिसरातील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वरिष्ठांनी याची दखल घेत तातडीने रिक्त असलेली पदे भरावीत. तसेच अधिकारी व कर्मचा-यांना मुख्यालयी राहण्याच्या सक्त सूचना द्याव्यात, अशी मागणी होत आहे.

★आरोग्य केंद्रातील रिक्त पदे

औषध निर्माण अधिकारी – 1
एएनएम – 7
एमपीडब्ल्यू – 4
वाहन चालक – 1
कनिष्ठ सहाय्यक – 1
परिचर – 4
एकूण रिक्त पदे – 18

★जीव गेल्यावर नवीन इमारत बांधणार का ?

धोकादायक इमारतीतून चालतो कारभार सुलेमान देवळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची अवस्था दयनीय झालेली असून सन 2016 साली ही इमारत राहण्यायोग्य नसून धोकादायक असल्याचा अहवाल सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. मात्र, गेल्या सहा वर्षांपासून याच धोकादायक इमारतीतून जीव धोक्यात घालत कर्मचा-यांना आरोग्य सेवा द्यावी लागत आहे. आरोग्य विभाग कर्मचारी व रुग्णांचा जीव गेल्यावर नवीन इमारत बांधणार का, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.

★आश्वासन दिले मात्र सुधारणा शून्य

सुलेमान देवळा येथील आरोग्य केंद्रात रुग्णसेवा ढेपाळल्याने ती सुरळीत करावी तसेच नवीन इमारत बांधण्यात यावी या मागणासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळोवेळी वरिष्ठांना अर्ज व निवेदने देत उपोषणही केले. यानंतर अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी भेट देऊन लवकरच आरोग्य सेवेत सुधारणा करून नवीन इमारत मंजूर करण्यासाठीचा प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठपत पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही या परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाल्याचे दिसून येत नाही.

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!