13.3 C
New York
Saturday, April 5, 2025

Buy now

spot_img
spot_img

तो मृत्यूशी झुंजतोय! मराठ्यांचे नेते काय करतायेत ?

[ मराठ्यांना मतांचं भीक मागणारे सर्वच सरकारमध्ये बसलेत आता आरक्षण तर मिळायलाच हवं! ]

★ मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी त्याची एकांकी झुंज!

★ मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आतील आरक्षणासाठी लढतोय तो!

★ दत्ता हडसणीकर यांची मराठा आरक्षणासाठी चाललेली झुंज आणि त्यांची खलवलेली प्रकृती!

नांदेड | न्यूज नेटवर्क

मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून 50% च्या आतील आरक्षण मिळावे या मागणीसाठी हदगाव तालुक्यातील हडसणी येथील तर तरुण एकटाच लढतोय एक मराठा लाख मराठा ही ताकद घेऊन दत्ता पाटील हा तरुण मागील पंधरा दिवसापासून उपोषणास बसला आहे. त्याची प्रकृती खालावल्याने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे परंतु अध्यापर्यंत शासनाने या उपोषणाची दखल घेतली नसल्याने मराठा समाजातील संघटना आक्रमक झाले आहेत..
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून समाजाने वेळोवेळी आंदोलने केली राज्यात आदर्श निर्माण करतील असे लाखोंची मोर्चे शांतता कायम ठेवली त्याच मोर्च्याची दखल घेऊन तात्कालीन सरकारने दिलेले आरक्षण टिकले नाही त्यामुळे पुन्हा मराठा समाजातील विद्यार्थी तरुणावर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असून त्याचे शैक्षणिक आर्थिक नुकसान होत आहे.. दरम्यान समाजातील एक कार्यकर्ता म्हणून दत्ता पाटील या तरुणाने त्याच्या अडचणी गावात आमरण उपोषण सुरू केले तब्बल 15 दिवस लोटूनही या उपोषणाची सरकारने दखल घेतली नाही.. उपोषण स्थळी विविध सामाजिक संघटना आणि राजकीय नेत्यांनी येऊन पाठिंबा दिला अनेकांनी विनंती करून दत्ता पाटील देखील दत्ता पाटील यांनी आपल्या उपोषणावर ठाम असून आरक्षणाचा पर्याय निघेपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचं सांगितले आहे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना शासकीय रुग्णालय नांदेड येथे दाखल करण्यात आले आहे या ठिकाणी अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी धाव घेत त्यांची चौकशी करून सोबत असल्याचं सांगितले आहे…

★ अशोक चव्हाण यांचे सरकारला आव्हान!

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुमारे दोन आठवड्यापासून उपोषणावर असलेले हदगाव तालुक्यातील दत्ता हडसणीकर यांच्या आंदोलनाचे राज्य सरकारने तातडीने दखल घ्यावी अशी मागणी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी केली आहे. चव्हाण यांनी सोमवारी दुपारी हडसणीकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाचा प्रश्न आम्ही लावून धरणारच आहोत.. त्यामुळे तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती ही त्यांनी केली दरम्यान हडसणीसकर यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य सरकारने तातडीने त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्याची आवश्यकता असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे…

★आणखी मराठ्यांचे मृत्यू पाहिजेत काय ?

मराठा समाज आरक्षणासाठी वेगवेगळ्या माध्यमातून आंदोलन करत आहे उपोषण करत आहे. राज्य शासनाला मात्र जाग यायला तयार नाही.. कोणतीही गंभीर दखल घ्यायला तयार नाही.. ठाम भूमिका घ्यायला तयार नाहीत.. मग मराठा समाजातील अनेक तरुणांनी टोकाचे पाऊल उचलून मराठा आरक्षणासाठी बलिदान दिले आहे.. अजून किती जणांचे बलिदान गेल्यावर आपण दखल घेणार आहात असं मराठा समाजातून आवाज पुढे येत आहे… आता बलिदान नाही तर सरकारचं बलिदान घेऊ आरक्षणासाठी हाच मराठा समाजातून सूर पुढे येत आहे…

★मराठ्यांना आरक्षण द्या म्हणणारे सर्वच सत्तेत!

मराठा समाजाच्या नावावर मतांचा जोगवा मागणारे सर्वच राजकीय पक्षाचे नेतेमंडळी सत्तेमध्ये बसले आहेत.. आता विरोधात कोणीच नाही.. आता तरी मराठा समाजाला आरक्षण द्यायला कसलीच अडचण नाही… आता सर्वच सत्तेत बसल्याने मराठ्यांचा आरक्षणाचा प्रश्न निकाली काढायला काहीच अडचण नाही.. अन आता जर मराठा आरक्षणाचा निकाल निघाला नाही तर मराठा समाज तुम्हाला सर्व निवडणुकांमध्ये जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही… तुम्हीच मराठा समाजाच्या नावावर जोगा मागत होता.. मराठा समाज यांना हक्काचा आरक्षण देण्याची वेळ आली आहे कारण की तुम्ही सर्वच सोबत सत्तेत बसला आहात आता जर आरक्षण देऊ शकला नाही तर मराठा समाज तुम्हाला भिक सुद्धा देणार नाही यातील मात्र शंका उरली नाही…

spot_img

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!