[ आष्टीच्या राजकारणात पावसाचा नव्हे ; पुराव्यांचा महापूर! ]
★60 लाख कुठे आणि 600 कुठे धससाहेब थोडी माहिती घेऊन बोला – आ. बाळासाहेब आजबे
★आमदार धस साहेब जनतेची दिशाभूल करू नका जनता आता खूप सुज्ञ झाली आमदार आजबेंचा धस यांना टोमणा!
★पत्रकार परिषद धस – आजबे यांची चर्चा मात्र राम खाडेंची कुठेतरी पाणी मुरतंय!
आष्टी | प्रतिनिधी
आ.धससाहेब …आपण केवळ आमच्या कुटुंबीयांची बदनामी करण्यासाठी देवस्थान जमिनीचा उल्लेख केला आहे.आपण या देवस्थान जमिनीबाबत आमच्या मालकीचे कागदपत्र काढण्याचा तहसीलपासून सर्व ठिकाणी प्रयत्न केला त्यासाठी विधानपरिषद सभागृहात दोन वेळेस लक्ष्यवेधी प्रश्नदेखील केला.परंतु आपणाला काहीही सापडले नाही.
तुम्ही देखील टिकाव खोरे,जेसीबी ,टू टेन लावून आमची माहिती खोदून काढावी असे माझे आपणास आव्हान आहे.आम्ही आतापर्यंत गप्प होतो परंतु आपण आपल्याकडे बोलण्यासारखे काही नसल्याने आमच्या कुटुंबावर आरोप केलेत. आपण तालुक्यातील अनेक देवस्थानच्या जमिनी कार्यकर्त्यांच्या नावावर करण्याचा प्रयत्न केलेला आहे.त्याची चौकशी देखील झालेली आहे आणि चौकशी नंतरच मा.उच्च न्यायालयाने देखील तुमच्यावर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.तो कसा दिला. आ.धससाहेब..देवस्थान जमीनीशी तुमचा सबंध नाही तर मग मा. न्यायालयाचा आदेश कसा ? असा आ.बाळासाहेब आजबे यांनी आ.धस यांना सवाल केला.
आ. सुरेश धस यांनी आमच्या कुटुंबावर देवस्थानाच्या जमिनी फुकट खाता असा आरोप केल्या आहे.तो अत्यंत चुकीचा असून दादेगाव येथील श्रीराम देवस्थान ची जमीन 700 एकर जमीन संपूर्ण गावकऱ्यांकडे पिढ्यान पिढ्या आहे .आमच्या कुटुंबकडे 350 नव्हे तर केवळ 35 एकर जमीन वहीतीसाठी आहे. सातबारावर आमचे नाव नाही.हे ही आमदार साहेब तुम्हीच सांगता त्यावर आम्ही दावा सांगितलेला नाही. पिढ्यानपिढ्या आम्ही ही जमीन वहीत करीत आहोत.1932 कालावधी पासूनच्या शेतसारा भरल्याच्या मोडी लिपीतल्या पावत्या आमच्याकडे आहेत.आपण म्हणता माझा देवस्थानाशी काही संबंध नाही परंतु न्यायालयाने आदेश दिल्यामुळे निश्चितपणे यामध्ये काहीतरी तथ्य असावे. त्यामुळे आपणदेखील याबाबत जबाबदारीने बोलले पाहिजे. सामाजिक कार्यकर्ते राम खाडे यांनी आपणाविरुद्ध तक्रारी केलेल्या आहेत. त्यामध्ये माझा काही संबंध नाही हे मी वारंवार सांगतो परंतु आपला हा समजच असेल तर काहीही हरकत नाही.मला काही फरक पडत नाही.खुंटेफळ साठवण तलावाबाबत मला काही माहिती नाही आणि आपण माहिती घेऊन बोलावे असा सल्ला देता परंतु आपण देखील लोणी ते मच्छिंद्रनाथगड सावरगाव या रस्त्यासाठी सर्वेक्षणाकरिता 60 लाख रुपये मंजूर झालेले आहेत असे असताना आपणच 600 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर केला आहे असे सांगून जनतेची दिशाभूल करता. आपणदेखील पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य करू नयेत. याबाबत खबरदारी घ्यावी आणि विनाकारण कोणाची बदनामी करू नये अशी आपणास करतो असे आ.आजबे यांनी शेवटी सांगितले.
★जनतेची किती दिशाभूल करता
खुंटेफळ साठवण तलावाबाबत मला काही माहिती नाही आणि आपण माहिती घेऊन बोलावे असा सल्ला देता परंतु आपण देखील लोणी ते मच्छिंद्रनाथगड सावरगाव या रस्त्यासाठी सर्वेक्षणाकरिता साठ लाख रुपये मंजूर झालेले आहेत असे असताना आपण 600 कोटी रुपयांचा रस्ता मंजूर केला आहे अशा वलग्ना करता आणि जनतेची दिशाभूल करता आपण देखील पूर्ण माहिती घेतल्याशिवाय जनतेची दिशाभूल करणारे वक्तव्य करू नयेत..
★नागरिक खूप जाणते झाले आता खोटं चालत नाही सोशल मीडियावर डायरेक्ट!
सोशल मीडियाचा वापर आज पर्यंत सर्वांनीच केला आहे. तू आता जनता देखील सोशल मीडियाचा चांगला वापर करत असून जनतेपासून काहीच लपून राहत नाही जनता खूप सुज्ञ झाली आहे त्यामुळे जनतेला फसवण वेड्यात काढणं किंवा दिशाभूल करणं तितकं सोपं राहिलं नाही जनता जाती झाली आहे 2024 ला जनता सर्व टप्प्यात आलं की कार्यक्रम करेल यातही शंका उरलेली नाही. समझनेवाले को इशारा काफी होता है! अशी खोचक प्रतिक्रिया आमदार आजबेंकडून आली आहे..