पुरवणी मागण्यात मतदारसंघातील रस्ते विकास कामासाठी 25 कोटी रुपये मंजूर – आ.बाळासाहेब आजबे

★आष्टी मतदारसंघातील दळणवळण सुधारण्यासाठी कोट्यावधीचा निधी मंजूर !
आष्टी | प्रतिनिधी

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याचे अर्थमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी आष्टी पाटोदा शिरूर मतदार संघातील रस्ते विकास कामासाठी आपण दिलेल्या पत्राद्वारे केलेल्या मागणीनुसार 25 कोटी रुपयांना मंजुरी देत मतदारसंघासाठी भरीव निधीची तरतूद केली आहे अशी माहिती आष्टी ,पाटोदा,शिरूर मतदार संघाचे आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
आष्टी,पाटोदा,शिरूर मतदार संघातील वेगवेगळ्या पाच रस्त्यांसाठी राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी पुरवणी मागणीमध्ये 25 कोटी रुपयांची तरतूद केली आहे त्यामध्ये जिल्हा सरहद्द 1)आलनवाडी -देवळाली- डोंगरगण -कडा- टाकळी -रुई वाकी प्रतिमा 4 किमी मधील रस्त्याचे सुधारणा व रुंदीकरण करण्यासाठी 07 कोटी रुपये,2) सावरगाव- शेडाळा- देऊळगाव घाट -पिंपळगाव घाट ते दौलवडगाव रस्ता की मी 42 ते 45 मध्ये सुधारणा करणे प्रतिमा 65 या रस्त्यासाठी 03 कोटी रुपये 3)हिवरसिंगे -डोंगरी- रोहतवाडी- थेरला- सावरगाव- सोनेगाव- दासखेड -पाचंग्री प्रजिमा 19 किमी 27 /33 ची सुधारणा करणे या रस्त्यासाठी 05 कोटी रुपये 4),रामा 62 नांदेवली रामा 63 वर येळम- बावी- आनंदगाव- पिंपळनेर -अंमळनेर- कुसळम रस्ता सुधारणा करणे या रस्त्यासाठी 05 कोटी रुपये आणि 5)घाटशिर पारगाव- टाकळी- पिंपळनेर- जाटनांदूर रस्ता प्रजिमा 15 किमी सुधारणा करणे तालुका शिरूर या रस्त्यासाठी 05 कोटी रुपये अशा एकूण 25 कोटी रुपयांच्या रस्ते विकास कामासाठी आपण केलेल्या मागणीनुसार माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब, कृषिमंत्री धनंजय मुंडे साहेब यांनी दखल घेत निधी मंजूर करून दिल्याबद्दल आपण सर्वांचे जाहीर आभार मानत असून यापुढेही मतदारसंघातील विविध विकास कामासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करण्यात येणार असून वेगवेगळ्या कामासाठी निधीची मागणी करण्यात आली असल्याचे यावेळी आमदार बाळासाहेब आजबे काका यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


