★कुसळंब – वांजरा फाटा या कोट्यावधीच्या रस्त्याला पहिल्याच पावसात ठिगळ जोडणी सुरू
★कोट्यावधीचा कुसळंब – वांजरा फाटा रस्ता खड्ड्यात गेल्याने पावसाळ्यात ठिगळाचे डांबरीकरण करून काय सिद्ध करायचे ?
★ कुसळंब – वांजरा फाटा – पिंपळवंडी या रस्त्याकडे कुणी लक्ष देता का लक्ष ; गुत्तेदार, अधिकाऱ्यांनी कोट्यावधी लुटले रेरेरेरे ?
कुसळंब | प्रतिनिधी
गुत्तेदार संबंधित अधिकारी आधुनिक टेक्नॉलॉजीचा वापर करत पावसाळ्यात डांबरीकरण करणं सुरू आहे. डांबरटपणा म्हणावं की काय असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.. आत्तापर्यंत नागरिकांनी पत्रकारांनी नेत्यांनी कुणीच पावसाळ्यात डांबरीकरण करताना पाहिले नाही परंतु कुसळंब – वांजरा फाटा रस्त्याचे गुत्तेदार अधिकारी चक्क पावसाळ्यात डांबरीकरण करून डांबरीटपणा सिद्ध करता येत की काय ? हा मोठा प्रश्न उपस्थित झाला आहे..
कुसळंब – वांजरा फाटा कोट्यावधीचा रस्ता पहिल्या पावसात पूर्णपणे खड्ड्यात गेल्याने चक्क पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचा डांबरटपणा सुरू आहे की काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.. संबंधित रस्ता कामातील गुत्तेदारी अधिकारी यांच्याकडून नवीन टेक्नॉलॉजीचा शोध लागल्याने त्यांच्या कामाचं कौतुक केलं जात आहे.. आज पावसात कोट्यावधी पाण्यात घालून पुन्हा पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचा डांबरटपणा करणारे तुरळकत पाहायला मिळतात असा जनतेमधून सूर निघत आहे.. पण असो संबंधित अधिकारी मग काय करतात असाही प्रश्न उपस्थित होत आहे..
★पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचा नवीन शोध ; पाहण्यासाठी जनतेची गर्दी!
कुसळम वांजरा फाटा या रस्त्यावर चक्क पावसाळ्यात डांबरीकरण करण्याचे काम सुरू आहे.. कोट्यावधीचे रस्ते महिन्यात खराब झाल्याने पावसाळ्यात खड्डे पडलेल्या जागेवर त्यात पाणी साचलेलं असताना त्यात डांबर ओतून काम करण्याची किमया सुरू आहे.. आता नवीन शोध लावल्याने जनतेच्या कुतूहल आता विषय बनला आहे.. हा नवीन शोध पाहण्यासाठी जनतेची गर्दी होत आहे…
★ वांजरा फाटा – कुसळंब रस्त्याला ठिगळ जोडणी सुरू
कुसळंब सह अठेगाव पुठ्यातील दहा पंधरा गावाच्या जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नाकडे इतकं दुर्लक्ष करणारे अधिकारी गुत्तेदार कसे काय असू शकतात.. कोट्यावधीचा रस्ता चक्क पाण्यात गेला.. आता पावसाळ्यात डांबरीकरण करून काय सिद्ध करायचे ? जनतेचा अंत पाहू नये! आणि पावसाळ्यात ठिगळाचे डांबरीकरण करणे ऐवजी सगळेच पैसे घेऊन जा आणि रस्ताही घेऊन जा अशा जनतेच्या प्रतिक्रिया पुढे येत आहेत…
★एस ए साबळे उपविभागीय अभियानता पाटोदा त्यांचा फोन बंद!
संबंधित कुसळंब वांजरा फाटा रस्त्याचे काम ज्यांच्या नियंत्रणाखाली चालते ते एस ए साबळे उपविभागीय अभियंता पाटोदा यांचा फोन चक्क काम सुरू असताना बंद असणं म्हणजे याचा अर्थ काय ? चक्क रस्त्याचं काम पाहणारे म्हणाले साहेबांचा फोन बंद आहे. पत्रकार आणि नागरिकांनी फोन केला असता फोन बंद होता.. त्यामुळे या रस्त्याबाबत शासन किती गंभीर आहे हे लक्षात येते.. आता हा रस्ता कायमचाच खराब होणार यातही शंका नाही..