जिल्हा परिषदेच्या शाळामध्ये डी.एड.,बी.एड. झालेल्या बेरोजगार तरुणांची नियुक्त करा – भाई विष्णुपंत घोलप
पाटोदा | प्रतिनिधी
सध्याच्या परिस्थितीमध्ये बेरोजगारीमुळे कित्येक मुला-मुलींचे लग्न होत नाहीत.नौकरी नसल्यामुळे नैराश्याचे वातावरण त्यांच्यामध्ये बळावले आहे, त्यामुळे व्यसनाधिनता वाढीस लागत आहे.व्यसनाधिनतेमुळे गुन्हेगारी वृत्ती वाढत आहे.त्यामुळे सामाजिक सलोखा बिघडत चाललेला आहे.त्यासाठी शासनाने 7 जुलै 2023 रोजी महाराष्ट्र शासनाचे उपसचिव तुषार महाजन यांच्या सहिने जो अध्यादेश काढला त्यामध्ये सेवानिवृत्त शिक्षकांना कंत्राटी तत्वावार नियुक्ती देण्यात येणार आहे त्यांची कमाल वयोमर्यादा 70% वर्ष व पगार (मानधन 20 हजार रुपये) देण्यात येणार आहे.
खरे तर सेवानिवृत्त शिक्षका ऐवजी बीड जिल्हयासहीत संपुर्ण महाराष्ट्रात डी.एड.,बी.एड.झालेले 20 ते 40 वयोगटातील लाखो बेरोजगार तरुण नैराश्याचे जीवन जगत असतांना ज्यांना पेन्शन मिळत आहे त्यांचे वय जास्त झाले आहे त्यांच्या कामाची क्रयशक्ती कमी झालेली आहे तरी सुध्दा त्यांना नियुक्तीपत्र देऊन शासन तरुण बेरोजगार तरुणांच्या जीवनाशी खेळत आहे. त्यासाठी शासनाने 7 जुलै 2023 चा अध्यादेश रद्द करुन तरुण डी.एड.,बी.एड. झालेल्या बेरोजगार तरुणांना नियुक्ती देऊन त्यांना जीवन जगण्यासाठी मुख्यप्रवाहात आणावे नसता डी.एड.,बी.एड. बेरोजगार तरुणांना बरोबर घेऊन भारतीय शेतकरी कामगार पक्ष तीव्र अंदोलन करेल याची शासनाची दखल घ्यावी असे लेखी निवेदनाव्दारे भाई विष्णुपंत घोलप यांनी महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री मा.ना.दिलीपजी केसरकर साहेब यांना उपविभागीय अधिकारी कार्यालय पाटोदा जि.बीड यांच्या मार्फत कळविले आहे. महितीस्तव शेकापचे सरचिटणीस आ.भाई जयंत पाटील यांना कळविले आहे.