★ सामाजिक कार्यकर्ते, राजकीय नेते मंडळी, पत्रकार बांधव, हितचिंतकडांकडून शुभेच्छांचा वर्षाव !
पाटोदा | प्रतिनिधी
पाटोदा तालुक्याचे भूषण ॲड.नरसिंह लक्ष्मणराव जाधव यांची उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद वकील संघाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल पाटोदा येथे त्यांचा भव्य सत्कार समारंभाचे पाटोदा तालुक्यातील सामाजिक राजकीय हितचिंतकाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते..
पाटोदा तालुक्यासाठी अभिमानाची बाब म्हणजे औरंगाबाद खंडपीठाच्या वकील संघाच्या अध्यक्षपदी ॲड. नरसिंह जाधव यांची निवड झाल्याबद्दल सर्व क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदन याचा वर्षा होत आहे. त्यांच्या या एवढी बद्दल पाटोदा येथील माझी कार्यकर्ते नेतेमंडळी हितचिंतकाच्या वतीने सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ॲड. जाधव यांनी आजच्या न्यायालयीन प्रक्रियेत आपण संविधानाच्या चौकटीत राहून गरीब जनतेस न्याय मिळवून देण्यासाठी कटिबद्ध राहून लोकांच्या विविध विकासात्मक प्रश्न जनहित याचिकेद्वारे लढून लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करून सोबतच आपल्यावरील आई-वडिलांचे संस्कारामुळेच आपण या पदावर पोहोचू शकलो काही भावना व्यक्त केल्या.. पाटोदा विश्रामगृहवर रविवारी सायंकाळी सामाजिक राजकीय हितचिंतकाबरोबर पत्रकारांकडून देखील यावेळी ॲड. नरसिंह जाधव यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी अनेकांनी मनोगत व्यक्त करत त्यांच्या कार्यावर आणि परिवाराच्या कार्यावर उजाळा टाकण्याचा प्रयत्न केला त्यांच्या शुभेच्छा ला उत्तर देताना जाधव यांनी देखील सर्वांना संबोधित करताना सर्वांच्या हितासाठी आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास राहण्यासाठी आपण काम करत राहू असाही शब्द देत सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभारी व्यक्त केले यावेळी मोठ्या संख्येने सामाजिक, राजकीय, शिक्षण, धार्मिक, पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते…
★पाटोद्याचा स्वाभिमानी बाणा औरंगाबादच्या खंडपीठामध्ये वकील संघाच्या अध्यक्षपदी!
ॲड. नरसिंह जाधव नेत्यांचं कुटुंबीय एक स्वाभिमानी बाण्या प्रमाणे आज पर्यंत जगत आले आहे. त्यांचं कार्य त्यांच्या कुटुंबीयांचे कार्य हे सर्वांनाच परिचित आहे. त्यांचा स्वाभिमान निष्ठा एक प्रकारे प्रेरणादायी आहे. याच स्वाभिमानी पाण्याचा पाटोदा तालुक्यातील सर्वांच्या वतीने झालेला गुणगौरव हा सर्वांनाच प्रेरणादायी आहे..
★कार्यकर्त्यांचा आवाजावर ॲड.जाधव यांच्याकडून न्याय त्याच न्यायाला पत्रकारांच्या लेखणीची धार – प्रा. सचिन पवार
पाटोदा तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांच्या राजकीय नेते मंडळींच्या भ्रष्टाचाराविरुद्धच्या आवाजावर खंडपीठामध्ये बाजू लावून धरणारे ॲड. जाधव साहेब हे न्याय मिळवून देत आहेत त्यांच्याच संघर्षाला पत्रकारांच्या लेखणीची धार देत आहोत यापुढे देखील देत राहू..
– प्रा.सचिन पवार
अध्यक्ष मराठी पत्रकार परिषद पाटोदा.