★श्रीमती साखरबाई राळेभात (हंबर्डे)अंगणवाडी सेवेतून निवृत्त
कुसळंब | प्रतिनिधी
मुलींचा आईमध्ये खुप जिव असतो,त्यांच्याप्रती खुप तळमळ असते परंतु ईच्छा असताना देखील त्या सासरच्या काही मर्यादेमुळे आईची सेवा करु शकत नाहीत, त्यामुळे सुनांनीच सेवानिवृत्तीनंतर आणि वृद्धपकाळात सासवांची सेवा करावी असे अवाहन अंगणवाडी पर्यवेक्षीका सौ.अलका ससाने यांनी केले. आष्टी येथील अंगणवाडी सेविका श्रीमती साखरबाई राळेभात(हंबर्डे) यांच्या सेवापूर्ती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर विश्वनाथ शिंदे,विजया शिंदे,शेख रसिदा,निर्मला सोले,रझिया पठाण आदी उपस्थित होते.
श्रीमती साखरबाई राळेभात यांची वयोमानानुसार सेवानिवृत्ती होत असुन त्यानिमित्ताने सर्व अंगणवाडी सेविकांच्या वतीने आणि नातेवाईक ,आप्तेष्टांनी त्यांच्या सेवापूर्ती कार्याक्रमाचे आयोजन आष्टी येथील अंगणवाडी कार्यालयात केले होते. यानिमित्ताने अंगणवाडी सेविका, नगरसेवक, नातेवाईक आदिंनी श्रीमती साखरबाई राळेभात यांचा पुष्पगुच्छ देऊन यतोच्छितपणे सत्कार करीत त्यांच्या सेवापूर्ती नंतरच्या आयुष्याला व आनंदाने जगण्यासाठी शुभेच्छा दिल्या. साखरबाई राळेभात यांचे आयुष्य तसे संघर्षातच गेले तरी देखील त्यांनी आनंदाने जिवन जगत अंगणवाडीतील बालगोपाळांशी एकरुप होऊन त्यांची देव समजुन सेवा केली.लहान मुल हे देवाघरची फुली मानली जातात आगदी त्याच प्रमाणे लहान मुलांना जिव लावत आपली एक वेगळीच प्रतिमा तयार केली. आजचा त्यांच्या सेवेचा शेवटचा दिवस या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी अंगणवाडी सेवीका,पर्यवेक्षक ,नातेवाईक यांनी उपस्थिती दर्शवित जड अंतकरणाने शुभेच्छा दिल्या. उपस्थित अनेकांना आपले अनुभव कथन करीत साखरबाई राळेभात यांच्या चांगुलपणाची ओळख करुन दिली, त्यांच्या आठवणीने अनेकांचा कंठ दाटुन आला तर अनेकांनी आपल्या आश्रुंना वाट मोकळी करुन दिली.एकीकडे आनंद होता आणि एकीकडे दु:ख होते. बालगोपांलांना आपली मँडम सोडून जात असल्याचे दु:ख होते तर साखरबाईंना सेवानिवृत्त नंतर आपल्या घरच्या नातेवाईकांना ,नातवांना आता वेळ देता येणार होता त्यामुळे त्या एका अंगाने आनंदी होत्या तर या पुढे लहान बालकांचा आपला संपर्क तुटणार आहे याचे दु:ख होते त्यामुळे त्या काहीशा जड अंतकरणाने वाटत होत्या. त्यांच्या सेवेच्या काळात त्यांना अनेकांनी मदत केल्याचा आवर्जून उल्लेख करीत सर्वांचे साखरबाई राळेभात यांनी आभार मानले.या प्रसंगी प्रा.सायली हंबर्डे यांनी आपल्या प्रेमळ वाणीने साखरबाई यांच्या आठवणीला उजाळा देत उपस्थित महिलांना भावनिक केले. त्यांच्या बरोबरच उपस्थित महिलांना देखिल साखरबाईंच्या आठवणीच्या प्रसंगाने आश्रु आवरता आले नाहीत.आमच्या सासुबाई म्हणून त्यांची सेवा करण्यासाठी जेवढे शक्य होईल तेवढे प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या प्रसंगी सांगितले.मंजुशा (हंबर्डे)बावडकर,साहेरा पठाण,रझिया पठाण,आशा (काकडे)हंबर्डे, प्रा.सायली हंबर्डे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमास मनिषा (हंबर्डे) पारठे,शोभा रानडे,अहिल्या चंद्रकांत हंबर्डे, मिना राकेश हंबर्डे, आशा प्रदिप हंबर्डे, निर्मला दिगांबर सोले,महेश हंबर्डे, अश्विनी महेश हंबर्डे, सायली तानाजी हंबर्डे, प्रदिप सोले,वंदना सोले यांच्यासह सर्व अंगणवाडी सेविका, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते,सुत्रसंचालन शोभा रानडे यांनी केले तर आभार प्रा.सायली हंबर्डे यांनी मानले.आल्पोआहाराने सेवापूर्ती कार्यक्रमाची सांगता झाली.


