★अमर वाळके यांची कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे मागणी
आष्टी | प्रतिनिधी
मागेल त्याला शेततळे अनुदान योजनेनुसार शेतकर्याला जास्तीत जास्त ७५ हजार अनुदान भेटते व रोजगार हमी योजनेअंतर्गत याच शेततळ्याला ५ लाख ७५ हजार अनुदान भेटते ही तफावत कशाला.हे दोन्ही शेततळे खोदण्यासाठी सारखेच पैसे लागतात मग रकमेमधी एवढी तफावत कशाला.मागेल त्याला शेततळ्याचे अनूदानात जर वाढ केली तर शेतकर्यांसाठी खूप फायदा होईल सर्व शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेतील.कालच कृषी मंत्री माननीय धनजंय मुंढे साहेब यांनी एक नवीन निर्णय घेतला की लाॅटरी सिस्टम बंध करून सरसकट जेवढे अर्ज आले असतील तेवढे सर्वांना या अनुदानाचा लाभ मिळावा.याच धर्तीवर शेततळ्याचे अनुदान जर वाढवले तर शेतकर्यांचा फायदा होईल व सर्व शेतकरी बांधव या योजनेचा लाभ घेतील तरी कृषी मंत्री माननीय धनजंय मुंढे साहेब यांनी शेततळे अनुदानात वाढ करावी अशी मागणी शेतकर्यांच्या वतीने अमर वाळके यांनी केली आहे.