ना.धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त निवारा बालगृहात शालेय साहित्याचे वाटप
सौताडा | प्रतिनिधी
अंमळनेर सर्कल चे तरुण तडफदार युवा नेते ऋषीकेश( भाऊ )सानप यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी समाजकल्याण व नुतन कृषीमंत्री लोकप्रिय नेते ना.धनंजयजी मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मोहा. ता जामखेड येथील अनाथ मुलांसाठी निवारा बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी साहित्याचे वाटप केले.सामाजिक जात असलेले व अंमळनेर सर्कल मधील सर्व सामान्य माणसाला मदतीला धावून जात गावोगावी २५/१५,आमदार फंड , जिल्हा विकास आराखडा, समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून अनेक कामे ऋषीकेश सानप यांनी केली आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व धनंजय मुंडे साहेब यांचे ते अत्यंत विश्वासू युवा सहकारी म्हणून ओळखले जातात. सामाजिक भावनेतून तसेच शिक्षणाप्रती असलेली त्यांची आवड असता लक्षात घेता या कार्यक्रम क्रमाचे आयोजन पै ऋषीकेश( भाऊ) सानप मित्र परिवार अंमळनेर सर्कल यांच्या कडून करण्यात आले होते. या शालेय साहित्य वाटप कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती पै.ऋषिकेश (भाऊ )सानप , अँड अरुण जाधव ,पै ओकार सानप,सौरभ आघाव, महादेव राख,ऋषी सानप (वडझरी) यांची होती, तसेच निवारा बालगृहातील शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.